शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफिची योग्य वेळ कोणती ? अनिल देशमुख यांचा सत्ताधाऱ्यांवर सवाल

By गणेश हुड | Updated: August 7, 2025 17:07 IST

Nagpur : बोनस आणि लाडक्या बहिणींचे २१०० रुपये कुठे गेले?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी  शेतकऱ्यांची कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकारला  ९ महिने झाले तरी कर्जमाफी केली नाही. योग्यवेळी कर्जमाफी करु असे सत्ताधारी म्हणतात. परंतु राज्यात गेल्या दोन वर्षात ६ हजार १२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.  आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी  कर्जमाफी व सातबारा करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  

विदर्भातील शेतकरी धान उत्पादनात आघाडीवर असतानाही धान खरेदी आणि बोनस देण्यात सरकार अपयशी ठरत आहे. हमीभाव २३६९रुपये असताना शेतकऱ्यांना व्यापाऱ्याकडून केवळ १७००-१८००  रुपये मिळत आहेत. शासनाने जाहीर केलेल्या बोनससाठी २५ मार्च २०२५ चा आदेश असूनही बहुतांश शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. केंद्रावर खताची टंचाई असून, कंपन्या लिंकींग करून जबरदस्तीने इतर वस्तू विकत आहेत. कृषी विभाग यावर कारवाई न करता केवळ केंद्रावर दोष टाकत आहे.

लाडक्या बहिणींना दरमहा   २१००  रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप याची पूर्तता केलेली नाही. राज्यभरातील कंत्राटदारांचे जवळपास ९० हजार कोटी रुपये प्रलंबित आहेत. त्यातून अनेक कंत्राटदार कर्जबाजारी झाले असून, हर्षल पाटील याने आत्महत्या केली आहे. हे सरकार आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करत असून, सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी वाढल्याचा आरोप देशमुख यांनी केला. यावेळी माजी मंत्री रमेश बंग,  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रवीण कुंटे, वेदप्रकाश आर्य, शब्बीर विद्रोही, शैलेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.  

९ ऑगस्टला शरद पवारांच्या उपस्थितीत मंडल यात्रा निघणारराष्ट्रवादी कॉंग्रेस(शरद पवार गट) पक्षाच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी दुपारी ११ वाजता नागपुरातील व्हेरायटी चौकातून  ओबीसी जनजागृती मंडल यात्रेला सुरुवात केली जाणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या यात्रेला हिरवी झेंडी दाखवितील. अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.  ही मंडल यात्रा ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.  यात जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नही मांडले जातील. शरद पवार हे राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे पहिले मुख्यमंत्री होते. 

बॅलेटवर निवडणुका घ्याव्याईव्हीएम व मतदार याद्यांचा घोळ, डुपलीकेट मतदार यामुळेच राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले. जगातील तज्ज्ञांनी ईव्हीएम सुरक्षीत नसल्याचा दावा करुन याचा निवडणुकीत वापर करू नये असे म्हणले आहे. त्यामुळे यापुढील निवडणुका बॅलेटपेपरवर घ्याव्यात अशी भूमिका अनिल देशमुख यांनी मांडली.

टॅग्स :nagpurनागपूरAnil Deshmukhअनिल देशमुख