भाषेच्या नावावर होणारी हिंसा आम्हाला मंजूर नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 23:42 IST2026-04-24T23:42:16+5:302026-04-24T23:42:31+5:30

भाषेवरून वाद होऊ नये हीच सरकारची भूमिका

We do not approve of violence in the name of language: Chief Minister Devendra Fadnavis | भाषेच्या नावावर होणारी हिंसा आम्हाला मंजूर नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाषेच्या नावावर होणारी हिंसा आम्हाला मंजूर नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भाषेच्या नावावर हिंसा करणे आम्हाला मंजूर नाही व भाषेवरून कुठलाही वाद होऊ नये हीच सरकारची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपुरात ते शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुंबई असो किंवा महाराष्ट्रात मराठीला प्राथमिकता द्या किंवा मराठीचा आग्रह धरणे चुकीचे नाही. मात्र या प्रकारचे वाद होऊ नये अशी सरकारची भूमिका आहे. ज्या ऑटो किंवा टॅक्सीचालकांना मराठी येत नाही त्यांना ती भाषा शिकवू. देशात जबरदस्ती करून कोणत्याही प्रकारे भाषेचा नावावर हिंसा करणे आम्हाला मंजूर नाही. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

आम आदमी पक्ष ज्याप्रकारे स्वप्न दाखवून सत्तेत आली होती त्यांची पूर्तता न करत त्यांनी जनतेचा विश्वासघात केला. अनेक लोकांचा मोहभंग झाला व ते आपपासून दूर गेले. ॲंटी करप्शन आंदोलनाचा बुरखा ओढून सत्तेचे राजकारण करण्यात आले हे आता जे त्या पक्षात आहेत त्यांनादेखील लक्षात आले आहे, असा दावादेखील त्यांनी केला.

Web Title : भाषा के नाम पर हिंसा अस्वीकार्य: मुख्यमंत्री फडणवीस

Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि भाषा के नाम पर हिंसा अस्वीकार्य है। सरकार का लक्ष्य भाषा संबंधी विवादों से बचना, महाराष्ट्र में मराठी को प्राथमिकता देना है, लेकिन इसे थोपना नहीं। उन्होंने आप पर जनता के विश्वासघात और भ्रष्टाचार विरोधी के नाम पर सत्ता की राजनीति करने का आरोप लगाया।

Web Title : Violence in the name of language unacceptable: CM Fadnavis

Web Summary : CM Fadnavis stated that violence in the name of language is unacceptable. The government aims to avoid language-related disputes, prioritizing Marathi in Maharashtra, but without forcing it. He criticized AAP for betraying public trust and engaging in power politics under the guise of anti-corruption.