शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
5
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
6
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
7
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
8
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
9
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
10
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
11
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
12
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
13
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
14
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
15
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
16
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
17
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
18
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
19
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
20
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
Daily Top 2Weekly Top 5

वासनकरच्या गुंतवणूकदारांना धमक्या

By admin | Updated: May 12, 2014 01:04 IST

गृहमंत्री आर.आर. पाटील आणि अन्य मंत्र्यांशी जवळचे संबंध आहेत. पोलीस आयुक्तांशीही बोलणे झाले आहे. आमचे कुणी काहीही बिघडवू शकत नाही,

नागपूर : गृहमंत्री आर.आर. पाटील आणि अन्य मंत्र्यांशी जवळचे संबंध आहेत. पोलीस आयुक्तांशीही बोलणे झाले आहे. आमचे कुणी काहीही बिघडवू शकत नाही, अशी वल्गना करीत प्रशांत वासनकरने रविवारी गुंतवणूकदारांना धमक्या दिल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर काही गुंतवणूकदारांनी लोकमतला दिली. पोलिसांच्या कारवाईनंतर रविवारीही शेकडो गुंतवणूकदारांनी वासनकरच्या हिल टॉप येथील कार्यालयावर धडक दिली. वासनकर दिवसभर बाऊन्सरच्या घोळक्यात होता. दहा बाऊन्सर त्याच्या सेवेत होते. तक्रार दिली तर खबरदार, अशी धमकी तो गुंतवणूकदारांना देत होता. अजूनही कारवाई करीत नसल्याने गुंतवणूकदार पोलिसांना दोष देत होते. वासनकरने रविवारी कार्यालयात गुंतवणूकदारांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या. पोलिसांकडे तक्रार करू नका, केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा धमकीवजा इशारा त्याने गुंतवणूकदाराला दिला. धमकीची तक्रार कोणत्याही गुंतवणूकदाराने पोलिसांकडे केलेली नाही. गर्दीत बोगस गुंतवणूकदार वासनकरने आपली माणसे गुंतवणूकदारांच्या गर्दीत पेरली होती. ती माणसे गुंतवणूकदारांना आमचेही लाखो रुपये फसले आहेत, असे सांगत होते. पोलिसात तक्रार केल्यास कुणालाही काहीच रक्कम मिळणार नाही. मी तक्रार करणार नाही, तुम्हीही करू नका. वार्ताहरांनी आपल्या फायद्यासाठी बातम्या छापल्याचे ते प्रत्येक गुंतवणूकदाराला आवर्जून सांगत होते. गुंतवणूक नसलेली माणसेही गेल्या दोन महिन्यांपासून वासनकराच्या कार्यालयात सकाळी १० वाजेपासून ड्युटी बजावत आहेत. ठेवी परत मागण्यासाठी आलेल्यांना तक्रार करू नका, सर्वांचे पैसे परत मिळतील, असे सांगण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. तीच माणसे आता गर्दीत आमच्याही ठेवी असल्याचे सांगून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम वाढवत आहे. गुंतवणूकदारांची चिंता वाढली कुणालाही रक्कम मिळणार नाही, याची कल्पना सर्वच गुंतवणूकदारांना आली आहे. त्यानंतरही काही गुंतवणूकदार बिल्डर विवेक पाठक यांच्यामुळे आम्ही गोत्यात आल्याचा आरोप करीत आहे. त्यात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले अभियंते, बँकेत काम करणारे अधिकारीही आहेत. कोणतीही बँक, संस्था वा कंपनी दोन वर्षात दामदुप्पट देऊ शकत नाही. त्यानंतरही लोकांनी वासनकरकडे रक्कम गुंतविली. डोक्यावर हात मारण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच उरले नाही. पैसे मिळाल्याशिवाय मुलीचे लग्न होणार नाही, या चिंतेत एक गुंतवणूकदार वासनकर याच्या कार्यालयासमोरील झाडाखाली बसला होता. आता ठेवीवर व्याज मिळणे बंद झाल्याने कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, अशी चिंता एका गुंतवणूकदाराने बोलून दाखविली. प्रॉपर्टीत मोठी गुंतवणूक लोकमतच्या वृत्तमालिकेनंतर वासनकरचा आर्थिक घोटाळा चव्हाट्यावर आला. लोकांनी वासनकरला रक्कम देणे बंद केले आणि परतीसाठी त्याच्याकडे फेर्‍या मारू लागले. गेल्या दोन वर्षांपासून वासनकर लोकांना खोटे आश्वासन देऊन परतवून लावत होता. पण आता गुंतवणूकदार रक्कम परतीवर ठाम असून त्यांच्यात आक्रोश वाढला आहे. वासनकरची सासूरवाडी गोंदियाची असून त्याने तिथे मोठी गुंतवणूक केल्याची माहिती आहे.