शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याच्या अखेरीस झाली भेट

By admin | Updated: March 6, 2016 02:55 IST

घरात वाद झाला, अन् वयाच्या १३ व्या वर्षी त्याने ओरिसातील घर सोडले. काही तरी करवून दाखवेन, या उद्देशाने भटकत भटकत नागपूर गाठले.

१३व्या वर्षी सोडले होते घर : मनोरुग्णालयाच्या प्रयत्नाला आले यशनागपूर : घरात वाद झाला, अन् वयाच्या १३ व्या वर्षी त्याने ओरिसातील घर सोडले. काही तरी करवून दाखवेन, या उद्देशाने भटकत भटकत नागपूर गाठले. विविध हॉटेल्समध्ये ‘कुक’ म्हणून काम केले. परंतु अचानक एक घटना घडली आणि पोलिसांनी त्याला शासकीय मनोरुग्णालयात उपचारासाठी आणले. अडीच महिन्यातील उपचारामुळे तो बरा झाला. त्याने सांगितलेल्या घराच्या पत्त्यावर माहिती देण्यात आली. तब्बल ४८ वर्षांनंतर वयाच्या ६१ व्या वर्षी त्याने आपल्या नातेवाईकाला पाहिले. दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. रुग्णालय प्रशासनाचे सोपस्कार पार पडेपर्यंत त्याने नातेवाईकाचा हात सोडला नव्हता. झालेली चूक त्याला उमगली होती, जगण्याची उमेद मिळाली होती प्रमोदकुमार ऊर्फ अगस्थ नायक असे त्या व्यक्तीचे नाव.ओरिसा, जिल्हा कंदमाल येथील दारिंगवाडी हे प्रमोदकुमारचे मूळ गाव. १३ वर्षांचा असताना घरात वादावादी झाली. त्या रात्री तो घराबाहेर पडला. काही तरी करून दाखविण्याच्या उद्देशाने. रेल्वेस्थानकावर गेला. एका रेल्वेत बसला. भटकत भटकत नागपुरात आला. पोटात भूक आणि हाताला काम मिळावे म्हणून एका हॉटेलमध्ये काम करू लागला. दुसऱ्यांची कामे पाहत पाहत तो कुक झाला. नंतर त्याने शहरातील अनेक हॉटेलमध्ये कामे केली. परंतु यादरम्यान एकदाही घरी परतला नाही किंवा पत्र लिहिले नाही. प्रमोदकुमारला मराठी, हिंदी भाषा फारशी येत नसल्याने तो फार कमी बोलायचा. यामुळे त्याला मित्रही नव्हते. हॉटेल हेच त्याच्यासाठी घर होते. डिसेंबर - २०१६ मध्ये एका गोष्टीवरून हॉटेल मालक आणि त्याच्यात वाद झाला. या वादामुळे त्याची मानसिक स्थिती ढासळली. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मालकाने याची तक्रार पोलिसाकडे केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यावर त्याला उपचारासाठी शासकीय मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. अडीच महिन्यांच्या उपचारानंतर तो बरा झाला. त्याची भाषा समजण्यास अडचण जात होती. मनोरुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. नितीन गुल्हाने यांनी त्यांचे उडिया असलेले मित्र एस.पी. मित्रा आणि प्रमोदकुमारची भेट घालून दिली. यामुळे त्याचे खरे नाव समोर आले आणि ओडिशाचा पत्ताही मिळाला. रुग्णालयातील सामाजिक कार्यकर्त्या अनघा मोहरील यांनी ओडिशा येथील दारिंगवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यांच्या घरच्यांना याची माहिती मिळाली तेव्हा त्याच्या मोठ्या भावाला विश्वासच बसला नव्हता. त्यांना बरे नसल्याने नातेवाईकांना नागपुरात पाठविले. तब्बल ४८ वर्षानंतर आपल्या नातेवाईकांना समोर पाहताच प्रमोदकुमारचे डोळे पाणावले. गळाभेट झाली. आता परत ताटातूट होऊ नये म्हणून त्याने नातेवाईकाचे हात घट पकडून ठेवले होते. जगण्याची उमेद हरवलेल्या प्रमोदकुमारला रुग्णालयामुळे जगण्याचे बळ आणि स्वकिय मिळाले होते. जाताना तो सर्व डॉक्टरांना भेटला. वयाच्या ६१ वर्षी त्याच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. प्रमोदकुमारला बरे करण्यापासून ते त्याला घरी पाठविण्यापर्यंतच्या या कार्यात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित नगरकर, उपअधीक्षक डॉ. नितीन गुल्हाने, मनोविकृती तज्ज्ञ डॉ. मामर्डे, डॉ. बागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चंगोले, डॉ. जाधव आणि सामाजिक कार्यकर्ता अनघा मोहरील यांचे विशेष प्रयत्न राहिले. (प्रतिनिधी)