शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील निवडणूक तयारीचा विजयवर्गीय यांनी घेतला आढावा

By योगेश पांडे | Updated: August 28, 2024 23:11 IST

नागपुरातील तीन मतदारसंघांतील भाजपच्या नियोजनावर मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व मध्यप्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत शहरातील तीन मतदारसंघात भाजपच्या विधानसभा निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघाच्या नियोजनाबाबत त्यांच्याच उपस्थितीत विजयवर्गीय यांनी जाणून घेतले. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना समन्वय राखत तळागाळापर्यंत पोहोचण्याची सूचना केली.

विजयवर्गीय यांच्याकडे नागपूर जिल्ह्याच्या सर्व विधानसभा मतदारसंघांचा प्रभार आहे. मागील आठवड्यात त्यांनी नागपूर ग्रामीणमधील सहाही मतदारसंघांचा आढावा घेतला होता. बुधवारी शहरातील दक्षिण, पश्चिम व दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघांचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात त्यांच्याच उपस्थितीत त्यांनी नियोजन जाणून घेतले. यावेळी त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली व एकूण नियोजनाचा आढावा घेतला. लोकसभेचे निकाल विसरून जनतेमध्ये जाऊन तळागाळात काम करण्यावर भर द्या अशी सूचना विजयवर्गीय यांनी केेली.तीन वेगवेगळ्या बैठकी त्यांनी घेतल्या. शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी या विधानसभा मतदारसंघांचे राजकीय चित्र त्यांच्यासमोर मांडले. तीनही मतदारसंघातील भाजपची बलस्थाने व त्रुटी यावर मंथन झाले. जनतेपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या विकासयोजना पोहोचवा. तसेच त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना अपेक्षित उपक्रम व कार्यक्रम राबवा असे निर्देश विजयवर्गीय यांनी दिली. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, आ.मोहन मते, माजी महापौर दयाशंकर तिवारी, निवडणुकीपर्यंत विजयवर्गीय हे प्रत्येक मतदारसंघाचा नियमित कालावधीने आढावा घेणार आहेत.संघ स्मृतिमंदिराला दिली भेटदरम्यान, सकाळच्या सुमारास विजयवर्गीय यांनी रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चादेखील केली. सुमारे अर्धा तास ते रेशीमबाग येथे होते. त्यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन देखील अभिवादन केले.ममता बॅनर्जी या हिटलरसारख्याच हुकूमशहायावेळी विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तुलना थेट हिटलरसोबत केली आहे. आजच्या काळात हिटलरनंतर जर कोणी हुकूमशहा असेल तर त्या ममता बॅनर्जी आहेत या शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले. पश्चिम बंगालमध्ये पोलीस, समाजकंटक आणि राजकारणी यांच्यात परस्पर संबंध आहेत. महिला डॉक्टरचा बलात्कार करणाऱ्याकडे पोलिसांची बाईक होती. असा सवाल त्यांनी विचारला. महिला मुख्यमंत्री असलेल्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. मुख्यमंत्री गुन्हेगारांच्या पाठीशी असतील तर अशा मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार आहे का असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :BJPभाजपा