शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅटो हब’ने बदलणार विदर्भाचा चेहरा

By admin | Updated: November 7, 2015 03:29 IST

विदर्भाची आर्थिक स्थिती बदलविण्याची शक्ती आॅटोमोबाईल हबमध्ये आहे. नागपुरात असा हब साकार झाला तर स्थानिक उद्योगांना चांगले दिवस येतील.

लोकमतच्या चर्चासत्रात व्हीआयए पदाधिकाऱ्यांचे मतनागपूर : विदर्भाची आर्थिक स्थिती बदलविण्याची शक्ती आॅटोमोबाईल हबमध्ये आहे. नागपुरात असा हब साकार झाला तर स्थानिक उद्योगांना चांगले दिवस येतील. त्यामुळे मुंबईनंतर नागपूरही देशाचे आर्थिक केंद्र होईल. यासाठी सरकारी हस्तक्षेपाची नितांत आवश्यकता आहे. शासकीय पुढाकाराने मोठे उद्योग नागपुरात आले तर संपूर्ण विदर्भाचा आर्थिक विकास झाल्याशिवाय राहणार नाही. येथे आॅटोमोबाईल उद्योग आले तर अनेक पूरक उद्योगही येतील. त्यामुळे एकूणच परिसराचा आर्थिक विकास होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होईल, असे मत विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. लोकमत भवनात लोकमतच्यावतीने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. चर्चासत्रात व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, माजी अध्यक्ष प्रफुल्लभाई दोशी, उपाध्यक्ष अनिल पारख, आसित सिन्हा, सचिव रोहित अग्रवाल, सहसचिव पंकज बक्शी, एनर्जी सेलचे संयोजक आर. बी. गोयनका आणि लेडीज एंटरप्रिनर विंगच्या अध्यक्ष वंदना शर्मा सहभागी झाले होते. याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी नागपूरसहीत विदर्भातील उद्योगाच्या वर्तमान स्थितीवर प्रकाश टाकला. मुंबई नंतर नागपूरला आर्थिक राजधानी करायचे असेल तर येथे मोठे उद्योग येणे गरजेचे आहे. त्यासाठी शासकीय पुढाकाराची गरज आहे. वीज महाग झाल्याने स्टील रोलिंग मिल्स बंद झाल्या आहेत. त्याचा परिणाम बेरोजगारी वाढण्यावर झाला आहे. कायद्याच्या जटीलतेमुळे उद्योजक कागदी प्रक्रियातच जास्त गुंतले आहेत. प्रत्येक आवश्यक परवान्यासाठी सातत्याने मुंबई, पुण्याच्या चकरा त्यांना माराव्या लागतात. गुन्हेगारी तत्त्वांच्या दहशतीमुळे उद्योजकांना सुरक्षा रक्षकासह रात्री पेट्रोलिंगही करावे लागते. औद्योगिक भागात घाण आणि कचरा ‘स्वच्छ भारत’ अभियानाची धज्जी उडवित आहेत. या समस्यांशिवाय व्हीआयएच्यावतीने विदर्भातील उद्योग विकासाच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलण्यात येत आहे. व्हीआयए शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचाही प्रयत्न करते आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. (प्रतिनिधी)