शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ स्वतंत्र करून भाजपने शिवसेनेला धडा शिकवावा

By admin | Updated: November 29, 2015 03:40 IST

देशाच्या स्वातंत्र्यापासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी होत आहे.परंतु वेळोवेळी कोणत्यातरी कारणामुळे ही मागणी पूर्ण झाली नाही.

गेव्ह आवारी : ‘वेगळा विदर्भ किती जवळ, किती दूर’ या विषयावर व्याख्याननागपूर : देशाच्या स्वातंत्र्यापासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी होत आहे.परंतु वेळोवेळी कोणत्यातरी कारणामुळे ही मागणी पूर्ण झाली नाही. भाजपने निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले होते. आता आश्वासनानुसार विदर्भ स्वतंत्र करून भाजपने शिवसेनेला धडा शिकवावा, असे प्रतिपादन माजी खासदार गेव्ह आवारी यांनी शनिवारी केले. जनमंचतर्फे धनवटे सभागृहात आयोजित ‘वेगळा विदर्भ, किती जवळ, किती दूर’ या विषयावर व्याखान देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनमंचचे सल्लागार शरद पाटील होते. अध्यक्ष अनिल किलोर ,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, जनमंचचे सचिव राजीव जगताप आदी व्यासपीठावर होते. विदर्भाच्या मागणीसाठी एक दबाव निर्माण झाला आहे. जनमंचने स्वतंत्र विदर्भाची चळळ हाती घेतली आहे. आपण सर्व विदर्भवादी आहोत. भाजपच्या हातात केंद्र व राज्यातील सत्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जोर लावला तर विदर्भाची निर्मिती होऊ शकते. या निर्णयाला आमचाही पाठिंबा राहील, अशी ग्वाही आवारी यांनी दिली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर १९५७-५८ च्या सुमारास विदर्भाची चळवळ जोमात होती. काँग्रेसचे नेते विदर्भवादी होते. परंतु यशवतंराव चव्हाण यांनी महाराष्ट्रासाठी त्याग करा, असे आवाहन केले. पुढे भाषावादाचा मुद्दा पुढे करून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. विदर्भ स्वतंत्र झाला तर मागास राहील. असे सांगितले जाते. परंतु यात तथ्य नाही. लहानशा स्वार्थासाठी तडजोड न करता नेत्यांची त्याग करण्याची तयारी असावी. आत्मविश्वास बाळगा, विदर्भाच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्यास स्वतंत्र विदर्भाच्या निमिर्तीला कोणीही रोखू शकणार नाही. असे मत प्रकाश दुबे यांनी व्यक्त केले.देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांनाही स्वतंत्र विदर्भ हवा आहे. शिवसेनेसोबत भाजप फार काळ सत्तेत राहणार नाही. अगामी निवडणुकीपूर्वी २०१८मध्ये स्वतंत्र विदर्भाची घोषणा होईल, असे भाकीत शरद पाटील यांनी केले. अनिल किलोर यांनी प्रस्ताविकातून जनमंचने विदर्भाच्या मुद्यावर घेतलेल्या कौलात विदर्भातील नागरिक स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले. परंतु जेव्हाजेव्हा विदर्भाची मागणी पुढे आली तेव्हा तेव्हा या मागणीला बगल देण्यात आल्याचे अनिल किलोर यांनी प्रस्ताविकातून सांगितले. संचालन सुहास खांडेकर यांनी तर आभार राजीव जगताप यांनी मानले. (प्रतिनिधी)