शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

संक्रमणकाळाचा उपयोग लढण्यासाठी करा!

By admin | Updated: May 12, 2014 01:01 IST

भारतासह जगातील सर्वच देशांमध्ये संक्रमणाचा काळ धुडगूस घालतो आहे. त्याचा उपयोग भांडवलवादी टाळकी परिवर्तनाच्या चळवळी उद्ध्वस्त करण्यासाठी करीत आहेत.

 नागपूर : भारतासह जगातील सर्वच देशांमध्ये संक्रमणाचा काळ धुडगूस घालतो आहे. त्याचा उपयोग भांडवलवादी टाळकी परिवर्तनाच्या चळवळी उद्ध्वस्त करण्यासाठी करीत आहेत. अशावेळी परिवर्तनवाद्यांनीसुद्धा या संक्रमणकाळाचा उपयोग लढण्यासाठी करावा. नवभांडवली जागतिकीकरणाचं,नव-साम्राज्यवाद्यांच्या उदारीकरणाचं आणि खासगीकरणाचं आक्रमण उद्ध्वस्त करण्यासाठी याचा उपयोग करा, असे आवाहन ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाच्या विद्यमाने आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ आणि निळाई सामाजिक व सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णचंद्र बुटी हॉल रामदासपेठ येथे आयोजित आंबेडकरी काव्यसंगितीला सुरुवात झाली. उद्घाटनीय कार्यक्रमात डॉ. मनोहर यांनी बीजभाषण केले. साहित्यिक अशोक बुरबुरे अध्यक्षस्थानी होते तर डॉ. प्रदीप आगलावे, राहुल दहीकर, प्रा. सतेश्वर मोरे प्रमुख अतिथी होते. डॉ. मनोहर म्हणाले, माहिती तंत्रज्ञान आणि माध्यमक्रांतीने इहवाद, बुद्धिवाद, व्यक्ती स्वातंत्र्यवाद, समता, स्वातंत्र्य आणि बंधूता या आधुनिक मूल्यांचा महाप्रकल्प अमान्य केलेला आहे. नवभांडवलशाहीच्या उदारीकरणाने आणि खासगीकरणाने जगाचं रूपांतर हृदयशून्य बाजारपेठेत केलेले आहे. मानवी मूल्यांना पदच्युत करून त्यांच्याजागी अर्थमूल्यांची प्रस्थापना केली जात आहे. या नवभांडवली उदारीकरणामुळे परिवर्तनवादी माणूस उदास व्हायला लागला आहे. परंतु हा संक्रमणाचा काळ आहे. तो पाहुण्यासारखा असतो. त्यामुळे परिवर्तनाच्या चळवळीतील सैनिकांचे हे निराश होणे प्रस्थापितांच्या दारात झोळी घेऊन जात राहणे आणि हौसला गमावून बसणे ही बाब सर्वच अभावग्रस्तांना उद्ध्वस्त करणार्‍या फॅसिझमला दार उघडून देण्यासारखे आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आजही मूल्यसंघर्ष पार विझून गेला असं नाही. भांडवलशाहीने स्वत:चा एकतर्फी विजय जाहीर करण्याचा खेळ केला असला तरी हा विजय खरा नव्हे. जगात आणि देशातील वेगवेगळ्या भागात हा संघर्ष थांबला नाही. परिवर्तनवाद्यांचा लोकशाही समाजवादावर विश्वास आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. अशोक बुरबुरे, डॉ. प्रदीप आगलावे, प्रा. सतेश्वर मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. त्रिलोक हजारे स्वागतपर भाषण केले. प्रास्ताविक रत्नाकर मेश्राम यांनी केले. मुख्य संयोजक प्रवीण कांबळे संचालन केले. शामराव हाडके यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)