शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
5
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
6
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
7
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
8
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
9
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
10
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
11
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
12
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
13
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
14
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
15
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
16
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
17
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
18
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा धुण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

By admin | Updated: May 18, 2014 01:03 IST

कोळसा धुण्याचे तंत्रज्ञान आणि प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी फायद्याच्या प्रक्रियेचा अवलंब करा, असे अंतरिम आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि) आणि

सोपान पांढरीपांडे - नागपूर

कोळसा धुण्याचे तंत्रज्ञान आणि प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी फायद्याच्या प्रक्रियेचा अवलंब करा, असे अंतरिम आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि) आणि महानिर्मितीला शुक्रवारी दिले. विदर्भातील १३२ ऊर्जा प्रकल्पांनी पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या प्रस्तावाला विरोध करणारी याचिका दाखल केली होती. ही याचिका महादुला येथील सामाजिक कार्यकर्ते रत्नदीप रंगारी यांनी दाखल केली होती. या सर्व ऊर्जा प्रकल्पांमुळे प्रदूषण वाढणार असून त्याचा परिणाम विदर्भातील २० दशलक्ष लोकांवर पडणार आहे. सर्व प्रकल्पांना एक लाख हेक्टर जमीन लागेल, शिवाय दर दिवशी ३६०० एमएमसी पाणी आणि १८ लाख टन कोळसा लागणार आहे. या प्रकल्पांमुळे विदर्भ हे राखेचे मैदान होईल तसेच विदर्भाचे तापमान ३ ते ४ अंश सेल्सियसने वाढेल. एनजीटीचा अंतरिम आदेश हा पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या २ जानेवारी २०१४ च्या अधिसूचनेनंतर आला आहे. सर्व प्रकल्प भौगोलिकरीत्या संवेदनशील शहरांमध्ये असल्याने वापरण्यात येणार्‍या कोळशाच्या राखेचे प्रमाण ३४ टक्क्यांपेक्षा कमी असावे. याची अंमलबजावणी तातडीने करावी, असे आदेश या अधिसूचनेत सर्व ऊर्जा प्रकल्पांना दिले आहेत. महानिर्मितीचा चंद्रपूर औष्णिक ऊर्जा प्रकल्प भौगोलिकरीत्या संवेदनशील शहरांत असल्याने ३४ टक्क्यांपेक्षा कमी राख असणार्‍या कोळशाचा उपयोग करावा, असे अधिसूचनेत स्पष्ट केले आहे. महानिर्मितीने गेल्या तीन वर्षांपासून धुलाई केलेला कोळसा वापरणे बंद केले आहे. हे तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रदूषण नियंत्रण नियमाचे उल्लंघन आहे. बोर्डाने महानिर्मितीच्या विरोधात अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. एलजीटीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निर्देश द्यावेत, असे याचिकाकर्त्याने याचिकेत म्हटले आहे.