शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवाद्यांच्या मोर्चावर पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:19 IST

नागपूर : वीज बिलाचा मुद्दा आणि वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी सोमवारी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर ...

नागपूर : वीज बिलाचा मुद्दा आणि वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी सोमवारी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाऊन घेराव करू पाहणाऱ्या मोर्चेकऱ्यांना अडवून पोलिसांनी वाहनात कोंबले, त्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाई करून सायंकाळी सोडण्यात आले.

कोरोना काळातील सर्व वीज बिल माफ करावे, विदर्भातील जनतेचा २०० युनिटपर्यंत वीज वापर नि:शुल्क करून त्यापुढील दर निम्मा करावा, कृषी पंपाचे बिल संपवावे आणि वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करावी, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवारी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अ‍ॅड. वामनराव चटप, राम नेवले, रंजना मामर्डे यांच्या नेतृत्वात संविधान चौकातून दुपारी १.३० वाजता प्रचंड घोषणाबाजी करीत हा मोर्चा निघाला.

विदर्भवाद्यांच्या मागील आंदोलनाचा अनुभव लक्षात घेऊन बेझनबाग चौकात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. या चौकात बॅरिकेड्‌स लावून मोर्चा अडविल्यावर विदर्भवादी अधिकच भडकले. नितीन राऊत यांना निवेदन स्वीकारण्यासाठी बोलवा अन्यथा निवेदन देण्यासाठी आम्हाला त्यांच्या निवासस्थानी जाऊ द्या, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली. मात्र पोलिसांनी मोर्चा रोखून धरला. यादरम्यान ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी झाली. बॅरिकेड्‌स ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. अखेर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. धरपकड करून अनेक स्त्री-पुरुषांना वाहनात कोंबले. सुमारे ३०० आंदोलकांना अटक करून पोलीस लाईन टाकळी येथील पोलीस मुख्यालयात नेण्यात आले व नंतर सोडून दिले. मोर्चात वीजग्राहक शेतकरी, महिला, तरुणांसह ॲड. मोरेश्‍वर टेंभुर्डे, अ‍ॅड. शरद कारेकर, मुकेश मासूरकर, अरुण केदार, रेखा निमजे, सुनिता येरणे, सुनील वडस्कर, रमेश लांजेवार, पुरुषोत्तम पाटील, कृष्णा भोंगाडे, अरुण नवले, अरुण वासलवार, नरेंद्र काकडे, किशोर पोतनवार, कविता जुनघरे, विजय मौंदेकर, अ‍ॅड. चैताली कटकवार, माधुरी पाझारे, माधुरी चव्हाण, धीरज मांढरे यांच्यासह अनेकांचा समावेश होता.

...

ही तर दडपशाही - राम नेवले

चर्चा करण्यासाठी निवेदन घेऊन येणार असल्याने आम्ही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना आम्ही १५ दिवसापूर्वीच कळविले होते. तरीही निवेदन न स्वीकारता ते गैरहजर राहिले. हा विदर्भाचा अपमान आहे. मात्र चर्चेला न येता पोलिसांनी बळाचा वापर करून अटक केली. ही दडपशाही असल्याचा आरोप राम नेवले यांनी केला आहे.

...