शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या कार्यपद्धतीवर संघ समाधानी

By admin | Updated: March 14, 2015 02:41 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवारी नागपुरातील रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरुवात झाली.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवारी नागपुरातील रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरुवात झाली. देशात झालेल्या राजकीय बदलानंतर प्रथमच होणाऱ्या या सभेत प्रतिनिधींचा उत्साह दिसून येत होता. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केंद्र शासनाची कार्यपद्धती व उपक्रमांवर समाधान व्यक्त करताना ‘स्वच्छ भारत’ मोहीम तसेच गंगा सुरक्षा योजनेचे कौतुकदेखील केले. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संघ परिवारातील ३५ संघटनांचे १,४०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. सकाळी ८.३० वाजता सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व भय्याजी जोशी यांच्या हस्ते या सभेचे उद्घाटन झाले. यावेळी सहसरकार्यवाह सुरेश सोनी, दत्तात्रेय होसबळे, डॉ. कृष्णगोपाल, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, संघटनमंत्री रामलाल, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया हे प्रामुख्याने उपस्थित होते.सरसंघचालकांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले व राष्ट्रनिर्माणासाठी आणखी जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले. भय्याजी जोशी यांनी २०१४-१५ चा वार्षिक अहवाल सभेसमोर मांडला. देशात सत्ताबदल झाल्यानंतर नागरिकांमध्ये नवी आशा पल्लवीत झाली आहे. केंद्र सरकारचे काम योग्य दिशेने सुरू आहे. स्वच्छता मोहीम, गंगा संवर्धनसारखे उपक्रम नक्कीच अभिनंदनीय आहेत. यात जनतेचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व यातूनच अनेक समस्यांचा तोडगा काढता येईल. केंद्र शासनाने देशाची सुरक्षा, स्वाभिमान व सार्वभौमत्व अबाधित राहण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन जोशी यांनी केले. यावेळी त्यांनी संघाच्या शारीरिक, बौद्धिक व प्रचार विभागांच्या कामाचा लेखाजोगा मांडला. सोबतच विविध प्रांतांमध्ये झालेल्या विविध कार्यक्रम, उपक्रम व विस्तार कार्यांवर प्रकाश टाकला. दुपारच्या सत्रात संघ परिवारातील काही संघटनांनी संक्षिप्तपणे त्यांच्या वार्षिक अहवालाचे कथन केले.