शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

उमरेड पोलीस ‘अ‍ॅक्शन’ मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:08 IST

उमरेड : शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाने चांगलेच तोंड वर केले आहे. तालुक्यात रुग्णसंख्या वाढतीवर आहे. कोविड केअर सेंटरमध्ये जागा ...

उमरेड : शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाने चांगलेच तोंड वर केले आहे. तालुक्यात रुग्णसंख्या वाढतीवर आहे. कोविड केअर सेंटरमध्ये जागा मिळणे कठीण झाले आहे. कोविड टेस्टसाठीसुद्धा तासन‌्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. औषधोपचारासाठी अक्षरश: हाल बेहाल होत आहेत. अशा अत्यंत विपरीत परिस्थितीतही नागरिकांची विनाकारण गर्दी सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याबाबत अनेकांच्या तक्रारी समोर येताच आता उमरेड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे चित्र दिसून येत आहे.

गुरुवारी सकाळच्या सुमारास उमरेडचे उपविभागीय पाेलीस अधिकारी भीमराव टेळे, पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या नेतृत्वात पथसंचलन करण्यात आले. यावेळी नियमांचा भंग केल्यास थेट गुन्हा दाखल केला जाईल. कुणाचीही हयगय केली जाणार नाही, अशा सूचनाही देण्यात आल्या. बंद असलेल्या दुकानांसमोर उभे राहू नये. दुकानासमोर बसू नये, अशा सूचना नगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

....

दुकानदार बाहेर, ग्राहक आत

मागील काही दिवसापासून इतवारी मुख्य बाजार ओळीतील काही दुकानदार दुकानाच्या बाहेर उभे राहून दुकानाच्या आत ग्राहकांना पाठवून खुलेआम व्यवसाय करीत असल्याच्या गंभीर बाबी समोर येत आहेत. याबाबत उमरेड तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीकडे तक्रारी गेल्या आहेत. असे असतानाही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दुकानदार दुकानाच्या बाहेर आणि ग्राहक आत अशा संपूर्ण प्रकारामुळे बाजारात चांगलीच गर्दी होत आहे. यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.