शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या संघर्ष सभेला उद्धव ठाकरे, दिग्विजय सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 09:39 IST2023-12-07T09:39:09+5:302023-12-07T09:39:34+5:30

बहुतांश आमदारांची विधानसभा निवडणुकीपूर्वी घरवापसी होईल, असा दावा अनिल देशमुख यांनी  केला. 

Uddhav Thackeray, Digvijay Singh at Sangharsh Sabha in presence of Sharad Pawar | शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या संघर्ष सभेला उद्धव ठाकरे, दिग्विजय सिंह

शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या संघर्ष सभेला उद्धव ठाकरे, दिग्विजय सिंह

नागपूर  : राष्ट्रवादीची संघर्ष यात्रा १२ डिसेंबर रोजी नागपुरात पोहोचणार असून, पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे.  या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

देशमुख म्हणाले, १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता झिरोमाईल येथे होणाऱ्या या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, ‘शेकाप’चे जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील खासदार, आमदार व वरिष्ठ नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार द्विधा मन:स्थितीत आहेत. ते  आमदार स्वखुशीने गेलेले नाहीत. ते गणेश मंडळासारखे अजितदादा मित्रमंडळ आहे. त्यांच्यासोबत गेलेल्या बहुतांश आमदारांची विधानसभा निवडणुकीपूर्वी घरवापसी होईल, असा दावा अनिल देशमुख यांनी  केला. 

Web Title: Uddhav Thackeray, Digvijay Singh at Sangharsh Sabha in presence of Sharad Pawar