दोघांनी लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:09 IST2021-06-09T04:09:37+5:302021-06-09T04:09:37+5:30

अक्षय मुरलीधर पंधरे (वय २७) याने रविवारी रात्री गळफास लावून घेतला. अक्षयचे आई-वडील खसाळा (आजरीमाजरी) परिसरात राहतात. तो फर्निचरचे ...

The two strangled | दोघांनी लावला गळफास

दोघांनी लावला गळफास

अक्षय मुरलीधर पंधरे (वय २७) याने रविवारी रात्री गळफास लावून घेतला. अक्षयचे आई-वडील खसाळा (आजरीमाजरी) परिसरात राहतात. तो फर्निचरचे काम करायचा आणि एकटाच भीलगाव-कामठी मार्गावर राहायचा. त्याने प्रेमविवाह केला होता, मात्र ते त्याने लपवून ठेवले होते, अशी माहिती पुढे आली आहे. त्याने आत्महत्या का केली ते स्पष्ट झाले नाही. रूपाली नितनवरे (वय २३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

दुसरी घटना हुडको कॉलनीत सोमवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. लक्ष्मण जयराम खेडकर (वय ५७) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांचा मुलगा पंकज (वय २९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---

Web Title: The two strangled