आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले दोन भाऊ  : रेल्वेस्थानकावरून परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 11:38 PM2020-04-02T23:38:46+5:302020-04-02T23:42:42+5:30

उत्तर प्रदेशातील नगला ब्रजलाल येथील दोन चुलतभाऊ महाल परिसरातील एका फरसानच्या दुकानात काम करतात. गुरुवारी त्यांना आजीचा मृत्यू झाल्याची बातमी समजली. दोघेही बॅग घेऊन रेल्वेस्थानकावर आले. परंतु एकही रिकामी जाणारी गाडी व मालगाडी नसल्यामुळे ते आपल्या आजीचे अंत्यदर्शनही घेऊ शकले नाहीत.

Two brothers who lose to their grandmother's funeral: returned from Railway station | आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले दोन भाऊ  : रेल्वेस्थानकावरून परतले

आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले दोन भाऊ  : रेल्वेस्थानकावरून परतले

Next
ठळक मुद्देमालगाडीही नसल्यामुळे झाली पंचाईत

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : उत्तर प्रदेशातील नगला ब्रजलाल येथील दोन चुलतभाऊ महाल परिसरातील एका फरसानच्या दुकानात काम करतात. गुरुवारी त्यांना आजीचा मृत्यू झाल्याची बातमी समजली. दोघेही बॅग घेऊन रेल्वेस्थानकावर आले. परंतु एकही रिकामी जाणारी गाडी व मालगाडी नसल्यामुळे ते आपल्या आजीचे अंत्यदर्शनही घेऊ शकले नाहीत. जड अंत:करणाने ते रेल्वेस्थानकावरून परतले.
नगला ब्रजलाल, उत्तर प्रदेश येथील रहिवासी रोहित बघेल (२१) आणि प्रदीप बघेल (२०) हे दोघेही चुलत भाऊ आहेत. गावात कामधंदा नसल्याने सहा महिन्यांपूर्वी ते नागपुरात आले. महाल येथील एका फरसानच्या दुकानात दोघांना काम मिळाले. काम मिळाल्याने ते आनंदी होते. दोन-तीन महिन्यांतून एकदा घरी पैसेही पाठवीत होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. रेल्वे, बस आणि सर्वच खासगी वाहतूक बंद झाली. फरसानचे दुकानही बंद झाले. त्यामुळे ते कामाच्या ठिकाणी थांबले. आज गुरुवारी त्यांना आजीच्या निधनाची बातमी समजली. अंत्यदर्शनाला जाण्यासाठी त्यांनी बॅग भरल्या आणि रेल्वेस्थानक गाठले. दुपारी ३.३० वाजता ते रेल्वेस्थानकावर पोहचले. त्यांनी रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना आपली अडचण सांगितली. त्यानंतर ते उपस्टेशन व्यवस्थापक सतीश ढाकणे यांना भेटले. रेल्वेगाड्या बंद असल्या तरी मालगाडी हा एकमेव पर्याय होता. परंतु पुढील अनेक तास मालगाडीही नसल्यामुळे त्यांना मदत करणे शक्य झाले नाही. त्यामुळे जड अंत:करणाने ते रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडले. यावेळी रेल्वेस्थानकावर उपस्थित लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी असा प्रसंग कुणावरही येऊ नये, अशा भावना व्यक्त केल्या.

Web Title: Two brothers who lose to their grandmother's funeral: returned from Railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.