शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

तूर डाळ १०० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 02:47 IST

मुंबईमध्ये जप्त करण्यात आलेली १० हजार क्ंिवटल तूर डाळ नागपुरात १०० रुपये किलो प्रमाणे खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबईत झाली होती जप्ती : रविवारपासून नागपुरात विक्री नागपूर : मुंबईमध्ये जप्त करण्यात आलेली १० हजार क्ंिवटल तूर डाळ नागपुरात १०० रुपये किलो प्रमाणे खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापैकी ४ हजार क्ंिवटल तूर डाळीची पहिली खेप नागपुरात दाखल झाली आहे. येत्या १५ मेपासून ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली. मुंबईत जप्त करण्यात आलेली ही तूर डाळ नागपूर शहरातील २५ केंद्रावरून तर ग्रामीण भागात ५ केंद्रावरून १०० रुपये किलो या प्रमाणे विक्री करण्यात येईल. ही डाळ ज्या दुकानांमध्ये उपलब्ध राहील, ती पुढीलप्रमाणे आहेत. सीताबर्डी, निर्मलानगर, अंबाझरी, बुटीबोरी इंडस्ट्रीज, फ्रेण्ड्स कॉलनी, दत्तात्रयनगर, सोमलवाडा, जयप्रकाशनगर येथील अपना भंडार केंद्रावर उपलब्ध राहील. याशिवाय महेशचंद्र शंकरलाल अग्रवाल (सदर), रितेश ट्रेडिंग कंपनी (सदर), प्रकाश प्रोव्हीजन्स (मोहननगर), शिवधान्य भंडार (हनुमाननगर), चौकोनी मैदान वार्ड क्रमांक ९, प्रियंका धान्य भंडार (पंचशीलनगर), डीएम अग्रवाल ) रविनगर, भारती इंटरप्रायजेस व संगम कंन्झुमर्स को.आॅप. सोसायटी हेमू कॉलनी (जरीपटका), श्याम किराणा स्टोअर्स (गड्डीगोदाम), कंवरराम कंझुमर्स (आहुजानगर जरीपटका), माता बम्लेश्वरी, स्वस्त धान्य दुकान वॉर्ड क्रमांक १४ नागपूर, न्यू सुभाष कन्झ्युमर्स सोसायटी वॉर्ड क्रमांक २१ नागपूर, नवयुवक सहकारी संस्था वॉर्ड क्रमांक १५ नागपूर, सप्तरंग सहकारी संस्था वॉर्ड क्रमांक २२ नागपूर, मेघा धान्य भंडार हावरापेठ वॉर्ड क्रमांक १४ नागपूर, मागासवर्गीय सहकारी संस्था आहुजानगर वॉर्ड क्रमांक ५७ नागपूर येथे उपलब्ध राहील. नागपूर ग्रामीणमध्ये श्री ट्रेडर्स काटोल, रतनलाल बरबटे व मुरलीधर झोपट कामठी, आर.एस. मोहने भंडारबोडी व डी.वाय. चिचखेडे मनसर ता. रामटेक येथे उपलब्ध होईल. (प्रतिनिधी)नागरिकांना आवाहन येत्या काळात नागपूर शहर व ग्रामीण भागातील इतर परवानाधारकांकडून आवश्यकतेनुसार साठा उपलब्ध असेपर्यंत तूरडाळीचे वाटप करण्याचा मानस आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासंदर्भात काही तक्रारी असल्यास अन्न धान्य वितरण अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.