सोनेगाव येथे तुकाराम महाराज बीज महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:09 IST2021-04-02T04:09:52+5:302021-04-02T04:09:52+5:30

पारशिवनी : श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या बीज महाेत्सवानिमित्त साेनेगाव (ता. पारशिवनी) येथे कार्यक्रमाचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. काेराेना ...

Tukaram Maharaj Seed Festival at Sonegaon | सोनेगाव येथे तुकाराम महाराज बीज महोत्सव

सोनेगाव येथे तुकाराम महाराज बीज महोत्सव

पारशिवनी : श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या बीज महाेत्सवानिमित्त साेनेगाव (ता. पारशिवनी) येथे कार्यक्रमाचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. काेराेना संक्रमणामुळे या कार्यक्रमाला माेजक्याच भाविकांनी हजेरी लावली हाेती.

कार्यक्रमाचे आयाेजन पुरुषोत्तम ठाकरे व गावकऱ्यांनी केले हाेते. सर्वप्रथम सकाळी गावातील सर्व देवाची पूजा करून हनुमान मंदिरातून दिंडी यात्रा काढण्यात आली. ही दिंडी यात्रा गावाजवळ असलेल्या नदीवर पोहचली. त्यानंतर नागपूर येथील बंडूपंत खिरेकर यांच्या हस्ते दहीकाला करण्यात आला. स्थानिक वारकरी महिला भजन मंडळाने भजन कार्यक्रम सादर केला. भागवत ठाकरे व ग्रामस्थांनी गावाला कोरोनामुक्त करण्याचे देवाला साकडे घातले.

यावेळी भागवत ठाकरे, चंद्रशेखर आमले, रामकृष्ण इंगोले, आनंदराव मस्के, उमराव आमले, विलास ठाकरे, नरेंद्र ठाकरे, प्रभाकर ठाकरे, नामदेव मेश्राम, वसंत सातनूरकर, रामराव वानखडे, समीर घेर, जगदीश इंगोले, वैभव इंगोले, मनीष इंगोले, उषा घेर, किसनाबाई भोयर, बेबी इंगोले, हर्षल घेर उपस्थित होते.

Web Title: Tukaram Maharaj Seed Festival at Sonegaon