शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक पळवून शिपायावर हल्ला आरोपीस पाच वर्षे कारावास

By admin | Updated: November 7, 2015 03:31 IST

कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना पारडी नाका भागातून ट्रक पळवून एका वाहतूक पोलीस शिपायावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या एका आरोपीला ...

नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना पारडी नाका भागातून ट्रक पळवून एका वाहतूक पोलीस शिपायावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या एका आरोपीला शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. डी. शुक्ला यांच्या न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शिशुपाल गंगाधर पेलने (२७), असे आरोपीचे नाव असून तो कुही तालुक्यातील शिवणी येथील रहिवासी आहे. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील रवींद्र कोचे यांनी काम पाहिले. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, फिर्यादी प्रवीणकुमार वैजनाथ पांडे (२७) हा ट्रकचालक आहे. तो टेलिफोन एक्सचेंज चौकातील हरजित बॉडी वर्क्स येथे राहतो. ७ जून २०१३ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याने आपला सीजी - ०४-जेए-१६१५ क्रमांकाचा दहा चाकी ट्रक गोमती हॉटेलजवळ उभा केला होता. टपरीवर चहा घेऊन तो आपल्या ट्रकच्या केबिनमध्ये चढत असताना त्याला शिशुपाल याने धक्का देऊन खाली पाडले होते. त्यानंतर शिशुपाल हा ट्रक घेऊन भंडारा मार्गाने पळाला होता. जुना पारडी नाका चौक येथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना ट्रकचालक पांडे याने या घटनेबाबत सांगताच वाहतूकचे पोलीस शिपाई संदीप देवशंकर गुप्ता यांनी हेड कॉन्स्टेबल अंबादास दुर्गे यांच्या आदेशान्वये मोटरसायकलने ट्रकचा पाठलाग सुरू केला होता. त्यांनी या ट्रकला कापसी येथील मोगा टायर्ससमोर रोखले होते. त्याच वेळी शिशुपाल हा ट्रकमधून उतरून पळून जाऊ लागताच संदीप गुप्ता यांनी त्याचा पाठलाग करून पकडले होते. मोठी झटापट होऊन आरोपीने गुप्ता यांच्या नाकावर ठोसा मारून पळ काढला होता. त्यांच्या नाकाचे हाड मोडून रक्तस्राव सुरू झाला होता. अशाही स्थितीत गुप्ता यांनी आरोपीला पकडून ठेवून हेड कॉन्स्टेबल दुर्गे यांना मोबाईलने कळवले होते. दुर्गे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन शिशुपाल याला पकडून कळमना पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एन. बी. गावंडे यांनी करून न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात ८ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला भादंविच्या ३९४ आणि ३३३ कलमांतर्गत प्रत्येकी ५ वर्षे सश्रम कारावास, १ हजार दंड, ३५३ कलमांतर्गत ३ महिने कारावास, ५०० रुपये दंड,अशी शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)