शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅफिक पोलिसाची भाईगिरी

By admin | Updated: June 13, 2015 03:00 IST

सामान्य नागरिकांना पोलिसांचा कोणताही त्रास होणार नाही. नागरिकांमध्ये मिळून मिसळून पोलीस काम करतील, असे आश्वासक बोल पोलीस आयुक्त जाहीरपणे ऐकवत आहेत.

गरीब तरुणावर अन्याय : सांगा सीपी साहेब, आता कसे करायचे ? नरेश डोंगरे नागपूर सामान्य नागरिकांना पोलिसांचा कोणताही त्रास होणार नाही. नागरिकांमध्ये मिळून मिसळून पोलीस काम करतील, असे आश्वासक बोल पोलीस आयुक्त जाहीरपणे ऐकवत आहेत. मात्र, आयुक्तांचे हे बोल पोलीस कर्मचाऱ्यांच्या कानावर गेलेले नाही. त्याचमुळे की काय, पोलिसांची हेकेखोरी, उर्मटपणा कायमच आहे. गुरुवारी रात्री पुन्हा त्याची प्रचिती आली. परिस्थितीशी झुंज देऊन भविष्याचा मार्ग शोधण्याचे प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी छळ छळ छळले. वाहतूक पोलिसांचे हे पाप उघड करून न्याय मिळवण्यासाठी धावपळ करणाऱ्या या तरुणाला अंबाझरी पोलीस अन् नियंत्रण कक्षानेही झटकले. प्रचंड संतापजनक असा हा घटनाक्रम गुरुवारी रात्री ८ ते ९ या कालावधीतील आहे.कुणाल शरद नगरकर (वय २४) हा तरुण रामनगरमध्ये राहातो. घरची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. रोजच्या जगण्यासाठी त्याला अन् त्याच्या कुटुंबीयांना रोजच संघर्ष करावा लागतो. उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कुणाल एका खासगी कंपनीत काम करतो. काम संपल्यानंतर मिळेल तेवढ्या वेळेत त्याचा अभ्यास सुरू असतो. गुरुवारी अशाच प्रकारे काम आटोपल्यानंतर रात्री ८ ते ८.३० च्या दरम्यान तो गोकुळपेठ बाजारातून भाजी घेऊन घराकडे निघाला. चौकात त्याला पांडे नामक एका वाहतूक पोलिसाने अडवले. ‘दारू पिके है क्या‘,असे विचारले. नाही म्हणताच कागदपत्रांची मागणी केली. दुचाकीची कागदपत्रे (आरसी बुक) दिल्यानंतर फालतू प्रश्न विचारत त्याला अंबाझरी ठाण्यात नेण्यात आले. तेथे चिरीमिरी घेण्याचे प्रयत्न झाले. कुणालकडे पैसे नव्हतेच, त्यामुळे देण्याचा प्रश्नच नव्हता. परिणामी दारू पिऊन वाहन चालविण्याचा आरोप करीत त्याच्या हातात वाहतूक पोलिसाने चालान दिले. ‘आपण दारू पीत नाही, एक थेंबही पिलेलो नाही, पाहिजे तर मेडिकल करा‘, अशी आर्जव कुणाल करीत होता. मात्र, त्याला पोलिसी खाक्या दाखवून गप्प करण्यात आले. वाहतूक पोलिसांकडून धाकदपटशा झाल्यामुळे कुणालने पोलीस ठाण्यातील काहींना विनंती केली. ‘आपले मेडिकल करा, मी दंड भरू शकत नाही‘, असे सांगितले. मात्र, त्याला दाद मिळाली नाही. त्यांनीही वाहतूक पोलिसांची कारवाई आहे. आता आमची ड्युटी संपत आहे, असे सांगून त्याला घरी जाण्याचा सल्ला दिला.