शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक पद्धतीने रंगला संक्रांत मेळावा

By admin | Updated: January 19, 2015 00:53 IST

नखशिखांत दागिन्यांनी मढलेल्या आणि नऊवारी घातलेल्या सखी... गीता मंदिर येथील सभागृहात ओसंडून वाहणारा उत्साह... कुणी उखाणे घेण्यात कुणी तीळ व्यंजनाच्या गोडीत...

स्पर्धा, मनोरंजनाची धमाल : सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : नखशिखांत दागिन्यांनी मढलेल्या आणि नऊवारी घातलेल्या सखी... गीता मंदिर येथील सभागृहात ओसंडून वाहणारा उत्साह... कुणी उखाणे घेण्यात कुणी तीळ व्यंजनाच्या गोडीत... ‘संक्रांत सखी’चा धमाका आणि ‘फॅशन शो’ ची धम्माल...अविस्मरणीय दिवस आणि पारंपरिक पद्धतीने रंगलेला संक्रांत मेळावा.
निमित्त होते लोकमत सखी मंचच्या संक्रांत मेळाव्याचे. उद्घाटन डुंभरे ज्वेलर्सचे शशांक डुंभरे व रेणु डुंभरे, सार्इंताज बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सचे मुकुंद श्रावणकर व रंजना श्रावणकर, कलाकृती साडीज्चे महेश कुमार, मधु ब्युटी पार्लरच्या माधुरी चौरसिया, वाघ्रळकर आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या स्वाती यांच्या उपस्थितीत झाले. या सोहळ्यात सखी आपल्या कुटुंबांसह उपस्थित होत्या. मेळाव्याची सुरुवात हळद कुंकू आणि तिळगुळ देऊन झाली. प्रत्येक सखीला मधु ब्युटी पार्लरच्यावतीने २५० रुपये किमतीचे फ्रूट फेशियलचे कूपन व वाघ्रळकर आयुर्वेदिक हॉस्पिटलच्यावतीने फेसपॅक संक्रांतीच्या वाणाच्या स्वरूपात देण्यात आले.
संक्रांत सखी स्पर्धा, उखाणे स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा व व्हेजिटेबल क्वीन या विशेष शोने सोहळ्यात रंगत आणली. यावेळी डुंबरे ज्वेलर्सच्या प्रतिनिधीने सखींना ज्वेलरी बचत योजनांची माहिती दिली. या मेळाव्याला डुंबरे ज्वेलर्स, सार्इं ताज बिल्डर अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, कलाकृती साडीज्, वाघ्रळकर आयुर्वेदिक हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर आणि मधु ब्युटी पार्लर आदींचे सहकार्य मिळाले. संचालन सखी मंच संयोजिका नेहा जोशी यांनी केले.
विविध स्टॉल्सवर उसळली गर्दी
या मेळाव्यात सखींसाठी विविध स्टॉल्स लावण्यात आले होते. यात पाणीपुरीपासून ते सौंदर्य साहित्य आणि साड्यांचे स्टॉल्सला सखींनी भरभरुन प्रतिसाद दिला. उत्कृष्ट स्टॉल्सला पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार सुचिता नारळे यांच्या एक्सक्ल्युसिव्ह ज्वेलरीच्या स्टॉलला प्रदान करण्यात आला.
सखींच्या प्रतिभेची परीक्षा
या मेळाव्यात संक्रांतीच्या विशेष व्यंजनाची स्पर्धा घेण्यात आली. यात सहभागी सखींनी तिखट तर कोणी गोड पदार्थ घरून तयार करून आणले होते. मेळाव्याच्या मुख्य आकर्षणापैकी एक पारंपरिक उखाणा स्पर्धेने रंगत आणली. व्हेजिटेबल क्वीन स्पर्धेत स्पर्धकांच्या कल्पनेला भरारी मिळाली.
यात सहभागी सखी भाजी आणि फळांचा वापर करून रँपवर चालल्या. ‘संक्रांती फॅशन शो’मध्ये सखी हलव्यांचे दागिने आणि साडी घालून रँपवर चालल्या. लहान मुलांसाठी घेण्यात आलेल्या ‘फॅशन शो’ ने मेळाव्याला वेगळी रंगत आणली. या विविध स्पर्धेचे परीक्षण श्वेता नानोटी, नीलिमा हारोडे, राजश्री गाणार, कल्याणी लामधरे, नीतू कुमार, मंजूषा बिवाटे, शालिनी मानापुरे, कल्पना गुलालकरी यांनी केले.(प्रतिनिधी)
विजेत्यांची नावे
तीळ व्यंजन : प्रथम माधुरी राऊत, द्वितीय- ललिता निकम, तृतीय श्रद्धा चव्हाण.
व्हेजिटेबल क्वीन- प्रथम कल्पना जांभुळकर, द्वितीय स्रेहा सालगुंजेवार, तृतीय विभा भुसारी, प्रोत्साहन पुरस्कार लीना पाटील व भावना चापके.
उखाणे स्पर्धा- प्रथम वनिता भाईक, द्वितीय प्रतिभा मदनकर आणि तृतीय संगीता पिसाळ.
संक्रांती फॅशन शो- प्रथम संध्या वरघडे, द्वितीय अर्चना पगाडे, तृतीय शोभा वासनिक, प्रोत्साहन पुरस्कार- विनया एकनाथे व ज्योति शेंडे
किड्स फॅशन शो- प्रथम मृदुल पौनीकर, द्वितीय स्पर्श वेरुळकर आणि तृतीय परिंद सावदेकर, प्रोत्साहन पुरस्कार- लोकेश शेळके व नियती उज्जैनकर.
प्रत्युषाने घेतला उखाणा
संक्रांती मेळाव्याचे मुख्य आकर्षण सोनी टीव्हीवरील ‘हम है ना’ या मालिकेचे कलावंत कंवर ढिल्लन आणि प्रत्युषा बॅनर्जी होते. या दोघांचे मेळाव्यात आगमन होताच एकच जल्लोष झाला. दोन्ही कलावंतांनी सखींशी संवाद साधत सखींच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.