शासकीय तंत्रनिकेतनचा आज दीक्षांत समारंभ

By Admin | Updated: February 11, 2016 03:30 IST2016-02-11T03:30:40+5:302016-02-11T03:30:40+5:30

स्थापनेची १०० वर्षे साजरी करीत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनचा १८ वा दीक्षांत सोहळा गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.

Today's Convocation of Government Polytechnic | शासकीय तंत्रनिकेतनचा आज दीक्षांत समारंभ

शासकीय तंत्रनिकेतनचा आज दीक्षांत समारंभ

नागपूर : स्थापनेची १०० वर्षे साजरी करीत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनचा १८ वा दीक्षांत सोहळा गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता तंत्रनिकेतनच्या परिसरात होणाऱ्या या सोहळ्यात ७०० हून अधिक विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहेत. दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर मेट्रो रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित हे उपस्थित राहणार आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावर्षी सर्वाधिक आठ सुवर्ण पदके ‘मेकॅनिकल’ विभागात अव्वल क्रमांक पटकाविणाऱ्या गौरव आरेकर याला प्रदान करण्यात येतील. यापाठोपाठ प्रिया रुठिया हिचा चार तर यश शाहू याचा तीन सुवर्ण पदके देऊन सत्कार करण्यात येईल.
यावर्षी दोन नव्या पदकांचा समावेश दीक्षांत समारंभात करण्यात आला आहे. एकूण २८ पदके कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येतील.
पत्रकार परिषदेला गुलाबराव ठाकरे, प्राचार्य डॉ. सी.एस. थोरात, परीक्षा नियंत्रक वाय.बी. दुपारे आणि टेक्सटाईल विभागाचे प्रमुख डॉ. दीपक कुळकर्णी उपस्थित होते.
पुरस्कार मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जुळ्या बहिणी तसेच जुळ्या भावांचा समावेश आहे. अजिंक्य आणि आदित्य पंचबुधे तसेच निधी व विधी जोशी यांचा यावेळी सत्कार होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Today's Convocation of Government Polytechnic