शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

जगाला गुडबाय करण्याची वेळ, मी फुटाळ्यावर लाईव्ह येतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जगाला गुडबाय करण्याची वेळ आल्याचे नमूद करून मी फुटाळ्यावर लाईव्ह येतोय, असे म्हणून मित्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जगाला गुडबाय करण्याची वेळ आल्याचे नमूद करून मी फुटाळ्यावर लाईव्ह येतोय, असे म्हणून मित्र तसेच आई-बाबांची क्षमा मागत आरोग्य दूत म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने विष प्राशन केले. शनिवारी दुपारी १ च्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. योगेश नासरे (वय अंदाजे २७) असे या तरुणाचे नाव असून, तो अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील रहिवासी आहे.

एका आमदाराच्या ॲम्ब्युलन्सवर आरोग्य दूत (चालक) म्हणून काम करणाऱ्या योगेशने शनिवारी दुपारी त्याच्या मित्रांना फेसबुकवर एक पोस्ट टॅग केली. ‘मित्रांनो माफ करा. आता जगाला गुडबाय करण्याची वेळ आली. चांगले काम करणाऱ्याला खूप त्रास सहन करावा लागतो, असे सांगून त्याने आपण फुटाळा तलावावर ‘लाईव्ह’ येणार असल्याचे त्यात नमूद केले. त्याने त्याच्या आई-वडिलांना माफी मागितली’, ही फेसबुक पोस्ट वाचून धोका लक्षात आल्यामुळे त्याच्या मित्रांनी ती लगेच व्हायरल केली. नागपूर पोलिसांनी फेसबुक पोस्ट वाचल्यानंतर अंबाझरीचे ठाणेदार डॉ. अशोक बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने फुटाळा तलावाकडे धाव घेतली. योगेश तलावात उडी घेईल, असा अंदाज होता. त्यामुळे या भागातील पोहणाऱ्या काही तरुणांनाही पोलिसांनी लगेच तेथे सज्ज ठेवले. १ वाजेच्या सुमारास एक तरुण फुटाळा तलावाकडे येत असल्याचे बघून पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेतली. ते पाहून योगेश बाजूच्या वस्तीकडे धावला. तेथे त्याने खिशातील विषाची बाटली काढून विष प्राशन केले. पोलिसांनी लगेच त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. तत्पूर्वी रस्त्यात पोलिसांनी त्याचे नाव, गाव, पत्ता जाणून घेतला. त्यानंतर त्याच्या नातेवाइकांना माहिती कळविण्यात आली. मेडिकलमध्ये पोलिसांनी आधीच सूचित केल्यामुळे डॉक्टरांचे पथक योगेशच्या उपचारासाठी सज्ज होते. त्यामुळे त्याच्यावर तातडीने उपचार सुरू झाले. त्याची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचे दुपारपर्यंतचे वृत्त होते.

---

मोटारसायकलने नागपुरात पोहोचला

ॲम्ब्युलन्सवर चालक म्हणून काम करणारा योगेश वेगवेगळ्या रुग्णांना घेऊन नागपुरात नेहमीच येत होता. त्यामुळे त्याला नागपूरची बऱ्यापैकी माहिती होती. आज तो मोटारसायकलने नागपुरात पोहोचला.

त्याने विष पिऊन फुटाळा तलावात उडी घेण्याचा विचार केला असावा, असा अंदाज ठाणेदार डॉ. बागुल यांनी व्यक्त केला.