नागपुरात उद्यापासून तीनदिवसीय विश्वशांती परिषद; श्रीलंकेचे मंत्री विजयदासा राजपक्षे यांच्या हस्ते उद्घाटन
By आनंद डेकाटे | Updated: May 14, 2026 20:30 IST2026-05-14T20:29:47+5:302026-05-14T20:30:56+5:30
Nagpur : संघकाया फाउंडेशन, इंडो एशियन मेत्ता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक शांतता, बौद्ध विचारांचा प्रसार आणि विविध देशांतील सांस्कृतिक देवाणघेवाण यांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर शहरात शुक्रवारपासून तीन दिवसीय ‘विश्वशांती परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे.

Three-day World Peace Conference to begin in Nagpur tomorrow; inaugurated by Sri Lankan Minister Vijayadasa Rajapaksa
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संघकाया फाउंडेशन, इंडो एशियन मेत्ता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक शांतता, बौद्ध विचारांचा प्रसार आणि विविध देशांतील सांस्कृतिक देवाणघेवाण यांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर शहरात शुक्रवारपासून तीन दिवसीय ‘विश्वशांती परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेसाठी श्रीलंका, म्यानमार, थायलंड, दक्षिण कोरिया, नेपाळ, भूतान, जपान, व्हिएतनाम, बांगलादेश आणि लाओस येथील प्रमुख धार्मिक नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात १५ मे रोजी सकाळी १० श्रीलंकेचे बुद्ध शासन मंत्री विजयदासा राजपक्षे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल.
१६ मे रोजी सिव्हिल लाइन्स येथील डाॅ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कल्चर एक्सचेंज प्रोग्राम’अंतर्गत श्रीलंका, बांगलादेश, भारत आणि म्यानमार येथील कलाकारांकडून नृत्य आणि गायनाचे सादरीकरण होणार आहे. तसेच १६ आणि १७ मे रोजी सायंकाळी ७ वाजता उत्तर नागपुरातील इंदोरा मैदान येथे संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. धनश्री राजेश बुरबुरे आणि अभिजित कोसंबी यांच्या संगीत मैफलींसह थायलंडच्या सुप्रसिद्ध गायिका सिस्टर अनिमिता या बौद्ध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.