शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शांतता साधनाने नाही साधनेने मिळते

By admin | Updated: September 21, 2014 01:12 IST

मनाला शांती साधनाने नाही तर साधनेने मिळते. साधन तत्कालीन सुख देते पण साधना चिरंतन आनंद देते, असे मत मुनीश्री सुवीरसागर यांनी शनिवारी व्यक्त केले. चिटणीस पार्क, महाल येथे महाराजांच्या भव्य

मुनीश्री सुवीरसागर : श्री सैतवाळ जैन संघटन मंडळनागपूर : मनाला शांती साधनाने नाही तर साधनेने मिळते. साधन तत्कालीन सुख देते पण साधना चिरंतन आनंद देते, असे मत मुनीश्री सुवीरसागर यांनी शनिवारी व्यक्त केले. चिटणीस पार्क, महाल येथे महाराजांच्या भव्य प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मनाला शांतता कशी मिळेल, या विषयावर महाराज प्रवचन देत होते. सुवीर संस्कार मंच आणि चातुर्मास कमेटी सकल जैन समाज यांच्यावतीने महाराजांच्या प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराज म्हणाले, संतांच्या पादप्रक्षालनाने सर्व पापांचे प्रक्षालन होते. आकांक्षा निर्माण झाली तर मन सातत्याने अशांत राहते. शांतता आपल्याजवळच असते. शांतता बाहेर शोधण्याची मुळातच गरज नसते. एकाग्रतेने ईश्वराचे नामस्मरण केले तर शांतीचा अनुभव होतो. आज आपण आपलीच संस्कृती विसरत चाललो आहोत. मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून शाळांमध्ये संस्कृत शिकविले गेले पाहिजे. यातूनच आपली संस्कृती आपण सांभाळू शकू. संग्रह करण्याची वृत्ती सोडून आपल्या गरजेपुरतेच आपण आपल्याजवळ बाळगले पाहिजे. पण आपल्या गरजा आपणच सातत्याने वाढवित असतो. मुनी आणि संतासाठी योग्य व्यवस्था करण्याचा प्रयत्न समाजाने केला पाहिजे. कारण संत आपल्या जीवनाचे सार आपल्याला सांगून योग्य मार्गाने नेत असतात. मुनी सुवीरसागरजी यांनी प्रवचनासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीची प्रशंसा केली. महाराज म्हणाले, आपली संस्कृती लोप पावते आहे. पहिले अतिथी देवो भव असायचे. आता कुत्र्यांपासून सावधान असे घरांवर लिहिले असते. ही प्रवचनमाला चिटणीस पार्क, महाल येथे सुरु असून रविवार दि. २१ सप्टेंबर रोजी प्रभु की पुकार विषयावर महाराजांचे प्रवचन सकाळी ८ वाजता होणार आहे. या प्रवचनाला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी)