शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

अणेंच्या मुद्यावरून विधान परिषदेत गोंधळ

By admin | Updated: December 16, 2015 03:10 IST

राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी मांडलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेसंदर्भात मंगळवारी सभागृहात निवेदन करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या सभापतींनी सरकारला दिले होते.

कामकाज तहकूब : सरकारतर्फे उद्या निवेदननागपूर : राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी मांडलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेसंदर्भात मंगळवारी सभागृहात निवेदन करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या सभापतींनी सरकारला दिले होते. परंतु सायंकाळपर्यंत निवेदन सादर करण्यात आले नव्हते. हा सभापतींचा अवमान असल्याचा मुद्दा उपस्थित करीत विरोधी सदस्यांनी निवेदन करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अणे यांच्याकडून वक्तव्याची माहिती घेतल्यानंतरच भूमिका स्पष्ट करता येईल, असे निदर्शनास आणले. यावर नाराजी व्यक्त करीत विरोधी सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातल्याने तालिका सभापती नरेद्र पाटील यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. अणे यांनी राज्याचे महाधिवक्ता म्हणून शपथ घेतलेली असल्याने त्यांना कोणत्याही स्वरूपाचे वैयक्तिक मत व्यक्त करता येत नाही. त्यांच्या वक्तव्यावर सरकारची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. सर्वपक्षीय सदस्यांनी अणेंसदर्भात भूमिका मांडल्यानंतर सभापतींनी सरकारला निवेदन सादर करण्याचे निर्देश दिले. परंतु मुख्यमंत्री त्यांच्या वक्तव्यावर पांघरुण घालत असल्याचा आरोप संजय दत्त यांनी केला. बुधवारी सकाळपर्यंत या संदर्भात सरकारने निवेदन करावे, अशी मागणी त्यांनी केली. एखादा घटनात्मक मुद्दा उपस्थित झाल्यानतंर तो प्रश्न प्राधान्याने विचारात घेण्याची गरज असल्याचे शरद रणपिसे यांनी निदर्शनास आणले. बुधवारी सभागृहाचे कामकाज संपण्यापूर्वी अणेंच्या वक्तव्यासंदर्भात निवेदन करण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिल्यानंतर सभागृहातील गोंधळ शमला.तत्पूर्वी सकाळी लक्षवेधीवरील चर्चा संपल्यानंतर मुंडे यांनी अणे संदर्भातील निवेदनाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सभागृहाचे कामकाज संपण्यापूर्वी निवेदन सादर क रण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु उपसभापती वसंत डावखरे यांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत निवेदन सादर करण्याचे निर्देश दिले होते. सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात अणेंच्या मुद्यावरून सरकाची कोंडी झाल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)