कोविड सेंटरमध्ये चोरी, आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST2021-06-24T04:08:07+5:302021-06-24T04:08:07+5:30

नागपूर : कोविड हॉस्पिटलसह पाच ठिकाणी चोरी करणाऱ्या आरोपींना गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली आहे. सद्दाम अस्लम खान (२५) रा. ...

Theft in Covid Center, accused arrested | कोविड सेंटरमध्ये चोरी, आरोपीस अटक

कोविड सेंटरमध्ये चोरी, आरोपीस अटक

नागपूर : कोविड हॉस्पिटलसह पाच ठिकाणी चोरी करणाऱ्या आरोपींना गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली आहे. सद्दाम अस्लम खान (२५) रा. गवळीपुरा, गिट्टीखदान आणि आदित्य विजेंद्र वरखेडे (१९) रा. आदिवासी कॉलनी अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी कुख्यात गुन्हेगार आहेत. त्यांनी १९ जून रोजी राजनगरच्या कोविड सेंटरमध्ये चौकीदाराला मारहाण करून लॅपटॉप, सीसीटीव्ही आणि मोबाईलची चोरी केली. कोविड सेंटरमध्ये चोरी झाल्यामुळे पोलीस चक्रावले होते. पोलिसांच्या तपासात आरोपींची माहिती मिळाली. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत कोविड सेंटरसह पाच ठिकाणी त्यांनी चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यांच्याकडुन १.१३ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपनिरीक्षक देवेंद्र पटले, हवालदार दीपक रेठे, बलजित ठाकूर, नीलेश इंगोले, इशाक आटे, दीपक लाकडे यांनी पार पाडली.

..............

Web Title: Theft in Covid Center, accused arrested