'कोरोनासारख्या संकटाचा पुन्हा धोका ! आपण आतापासूनच सज्ज राहिले पाहिजे' विश्व शांती परिषदेत वडेट्टीवारांचा इशारा
By आनंद डेकाटे | Updated: May 16, 2026 20:07 IST2026-05-16T19:55:02+5:302026-05-16T20:07:29+5:30
Nagpur : तथागत भगवान गौतम बुद्धांनी हजारो वर्षांपूर्वी दिलेला अहिंसा, शांती, प्रेम आणि करुणेचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरतो आहे. लोभ, द्वेष आणि हिंसाचाराच्या विळख्यात अडकलेल्या जगाला बुद्धांच्या विचारांशिवाय पर्याय नाही,” असे प्रतिपादन माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

'The threat of a crisis like Corona is back! We must be ready from now on', warns Vadettiwar at the World Peace Conference
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तथागत भगवान गौतम बुद्धांनी हजारो वर्षांपूर्वी दिलेला अहिंसा, शांती, प्रेम आणि करुणेचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरतो आहे. लोभ, द्वेष आणि हिंसाचाराच्या विळख्यात अडकलेल्या जगाला बुद्धांच्या विचारांशिवाय पर्याय नाही,” असे प्रतिपादन माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. देशातील सध्याची परिस्थिती पाहता, आपण पुन्हा कोरोनासारख्या मोठ्या आपत्तींच्या दिशेने जात आहोत असे वाटते. अशा संकटांना तोंड देण्यासाठी समाजाने आतापासूनच सज्ज राहिले पाहिजे,” असा इशाराही व़ेट्टीवार यांनी यावेळी दिला.
इंडो एशियन मेत्ता फाउंडेशन, संघ काया फाउंडेशन, दीक्षाभूमी चॅरिटेबल ट्रस्ट, ग्लोबल युनायटेड एज्युकेशन अँड सोशल सोसायटी आणि शताब्दी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘विश्व शांती परिषद च्या दुसऱ्या दिवशी डाॅ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित सत्रात ते बोलत होते. याप्रसंगी श्रीलंका सरकारचे माजी मंत्री डॉ. विजयदासा राजपक्षे, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे, माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह महानायक भंते मदम्पगामा अस्सजी थिसा, अंबलगोडा धम्मलंकारा थेरो, डॉ. ली ची रान (दक्षिण कोरिया), भंते थेपसाकदा फेतसालाथ (लाओस), भिक्षू तपसी धम्म (नेपाळ), डॉ. एम.के. ओटानी, पंकज सेठी, भंते राजरत्नजी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक भंते प्रशीलरत्न गौतम यांनी केले. स्वागत रमेश वानखेडे यांनी तर आभार नितीन गजभिये यांनी मानले.
भिक्खू संघाला संघदान , 'धम्म दूत अवॉर्ड'
सांस्कृतिक आणि धम्म कार्यक्रम या सोहळ्यादरम्यान उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शेकडो भिक्खूंना संघदान करण्यात आले, तसेच 'धम्म दूत अवॉर्ड' चे वितरण आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील 'संघर्ष' या नाटिकेचे शानदार सादरीकरण करण्यात आले. इंदोरा मैदानावर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात थायलंडच्या बौद्ध गायिका सिस्टर अनमीताचाई, डॉ. धनश्री बुरबुरे आणि राजेश बुलबुल यांनी भीम-बुद्ध गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.