शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘न थकणाऱ्या’ राजांची गाेष्ट !

By राजेश शेगोकार | Updated: May 2, 2026 20:39 IST

Nagpur Article : सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत, डोळ्यांत स्वराज्याचे स्वप्न घेऊन, पायांत वादळाची गती असलेले छत्रपती श्री शिवाजी राजे हे उभ्या महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे उर्जास्थान... ही संजीवन उर्जा आजही महाराष्ट्राला एका धाग्यात बांधते.

राजेश शेगोकार नागपूर : सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत, डोळ्यांत स्वराज्याचे स्वप्न घेऊन, पायांत वादळाची गती असलेले छत्रपती श्री शिवाजी राजे हे उभ्या महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे उर्जास्थान... ही संजीवन उर्जा आजही महाराष्ट्राला एका धाग्यात बांधते. अठरापगड जातीमध्ये त्यांचे ‘राजेपण’ डाेक्यावर व डाेक्यात घेऊन मिरवले जाते, कारण ते जाणते राजे हाेते. ऐन तारूण्यातच त्यांनी तोरणा जिंकला, राजगड उभा केला आणि स्वराज्याची पहिली पायाभरणी केली. प्रत्येक किल्ला म्हणजे एक लढाई, प्रत्येक लढाई म्हणजे एक नवा निर्धार. प्रतापगडाच्या पायथ्याशी बलाढ्य, कपटी आणि गर्विष्ठ अफजलखान उभा होता. पण बुद्धिमत्ता आणि अचूक नियोजनाच्या बळावर त्यांनी संकटालाच संधीत रूपांतरित केले. संकटे समोर आली, शत्रू डोळे वटारून उभा राहिला, तरी हे राजे कधी डगमगले नाहीत, कधी थकले नाहीत.  

पन्हाळगडातून सुटताना रात्र काळोखी होती, वाट धोक्यांनी भरलेली. सोबत होते काही मोजके मावळे, आणि दूरवर विशाळगडाची आशा. त्या प्रवासात बाजी प्रभूंनी जीव ओवाळून टाकला, पण राजांची चाल थांबली नाही.  आग्रा मुघल दरबाराची कोंडी, नजरकैद, आणि मृत्यूची सावली. पण औरंगजेबाच्या बंदोबस्तातूनही राजे सुटले.  वर्षानुवर्षांच्या अथक संघर्षानंतर रायगडावर राज्याभिषेक झाला. सोनेरी सिंहासन, जल्लोष, आणि अभिमानाचा क्षण. पण या सगळ्यांतही ते थांबले नाहीत. राज्य उभं करणं जितकं कठीण, तितकंच ते टिकवणंही अन् ते त्यासाठी पुन्हा झटत राहिले... हाच इतिहास शिकत अनेक पिढ्या घडल्या. पण धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम आता नव्याने इतिहास लिहू पाहत आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी राज्य समर्थ रामदास स्वामी यांना सांभाळण्याची विनंती केली, असा दावा धीरेंद्र शास्त्रींनी केला. त्यांचा हा दावा केवळ वादग्रस्त नाही, तर इतिहासाच्या मूलभूत सत्यालाच छेद देणारा आहे.     

अलीकडच्या काळात धार्मिक व राजकीय व्यासपीठांवरून इतिहासाचे ‘नवे अर्थ’ लावण्याची एक धोकादायक प्रवृत्ती वाढताना दिसते आहे. शिवछत्रपतींच्या आयुष्याचा मागोवा घेतला, तर ‘थकलेला राजा’ ही कल्पनाच फोल ठरते. त्यांचा दावा इतिहासाच्या कोणत्या पुराव्यावर आधारित आहे? यांचा संदर्भ धीरेंद्र शास्त्रींनी दिला नाही. मुळात हा प्रकार अज्ञानाचाच नाही तर जाणूनबुजून केलेल्या विकृतीकरणाचा आहे. 

  अनेक इतिहास संशोधनाच्या दृष्टीने पाहिले, तर शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांचे नाते हे गुरु-शिष्याचे नव्हते त्यामुळे राज्यकारभार हस्तांतरित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण शिवछत्रपतींनी १६७४ मध्ये विधिवत राज्याभिषेक करून स्वराज्याला राजकीय वैधता दिली होती. हे राज्य त्यांनी प्रजेसाठी उभे केले होते ते कोणालाही ‘दान’ करण्याचा प्रश्नच नव्हता. केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी धीरेंद्र शास्त्रींनी इतिहासाशी असा खेळ केला की जाणीवपूर्वक नवा इतिहास पेरण्याची ही कुटनिती आहे? इतिहास हा भावनांचा नव्हे, तर पुराव्यांचा विषय आहे. तो बदलता येत नाही, फक्त समजून घ्यावा लागतो. शिवछत्रपतींचे कार्य इतके भव्य आहे की त्याला कोणत्याही काल्पनिक कथा किंवा दाव्यांची गरज नाही. शिवाय हा महाराष्ट्र आहे, येथे छत्रपतींचा विचार व इतिहास संजीवन आहे.   या मातीत स्वराज्याचा स्वाभिमान रुजलेला आहे. भूमीत धीरेंद्र शास्त्रींसारख्या प्रवृत्ती उगवू शकतात, पण टिकू शकत नाहीत.

गैरसाेयीची अभिव्यक्ती अन् साेयीचे स्वातंत्र्य

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘शिवाजी काेण हाेता?’ या पुस्तकावरून बुलढाण्याचे आमदार संजय गायाकवाड यांनी थेट पुस्तकाचे प्रकाशकांना धमकीचा फाेन केला व ताे व्हायरल झाल्यावर महाराष्ट्रभर निषेधाचे वादळ उठले. काहींनी गायकवांडांची साेयीनुसार पाठराखणही केली. गायकवाडांनी नंतर दिलगिरी व्यक्त करून पडदा टाकण्याचाही प्रयत्न केला. पण या वादात गायकवाडांसह त्यांची पाठराखण करणाऱ्यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या शिवछत्रपतींबाबतच्या वादग्रस्त विधानावर मात्र चुप्पी साधली? तेथे ना संताप, ना निषेध, ना भूमिका! म्हणजे पुस्तकातले विचार ‘गैरसोयीचे’ वाटले की आक्रमक अभिव्यक्ती, आणि धार्मिक व्यासपीठावरून इतिहासाला वाकवणारे विधान ‘सोयीचे’ वाटले की मौन ही कोणती दुटप्पी भूमिका? हे एकच उदाहरण नाही; अलीकडच्या काळात ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या संकल्पनेचं सोयीस्कर तुकडे करणं सुरू आहे. आपल्या विचारांना पूरक असेल तेव्हा स्वातंत्र्याचा गजर, आणि विरोधी असेल तेव्हा त्याच स्वातंत्र्याला गळा घोटण्याची तयारी ही प्रवृत्ती धोकादायक आहे. अभिव्यक्ती म्हणजे फक्त आवाज उठवणं नाही, तर सातत्याने आणि तत्त्वनिष्ठ भूमिका घेणं. नाहीतर ते स्वातंत्र्य नसून, सोयीचा मुखवटा ठरतो.

English
हिंदी सारांश
Web Title : The Story of a King Who Never Tired: Shivaji Maharaj

Web Summary : Dhirendra Shastri's claim that Shivaji Maharaj tired and asked Ramdas Swami to take over the kingdom is false. Shivaji's life proves otherwise, and history shouldn't be twisted for convenience. Expression of freedom is being misused, and selective outrage is harmful.
टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र