शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाची मूळ प्रत देशात काही निवडक ठिकाणीच ! नागपूरच्या दीक्षाभूमीलाही तो मान प्राप्त

By आनंद डेकाटे | Updated: November 26, 2025 17:30 IST

Nagpur : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान हे जगभरातील देशासाठी प्रेरक मानले जाते. अमलात आणल्यापासून त्यात अनेक सुधारणा झाल्या आहेत व हीच लवचिक विशेषतः त्यात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान हे जगभरातील देशासाठी प्रेरक मानले जाते. अमलात आणल्यापासून त्यात अनेक सुधारणा झाल्या आहेत व हीच लवचिक विशेषतः त्यात आहे. मात्र, त्यावेळी संसदेत अनेक दिवस चर्चा करून तयार झालेली संविधानाची मूळ प्रत देशासाठी महत्त्वाचा दस्तावेज होय. ही दुर्मीळ मूळ प्रत भारतीय संसदेसह देशात काही निवडक ठिकाणीच ठेवली आहे. तो मान नागपूरच्यादीक्षाभूमीलाही मिळाला आहे. बाबासाहेबांचे विश्वासू दादासाहेब गायकवाड यांनी ही प्रत त्यावेळी दीक्षाभूमीला भेट दिली होती, जी आजही येथे संग्रही आहे.

भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी, बाबासाहेबांच्या अनेक आंदोलनात ते सोबत होते. रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली तेव्हा त्या पक्षाचे नेतृत्वही त्यांनीच केले होते. रिपब्लिकन पक्षातर्फे त्यांनी लोकसभा व राज्यसभा सदस्य म्हणूनही कार्य केले. दीक्षाभूमीच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या स्मारक समितीचे ते पहिले अध्यक्षही होते. त्यांच्याच नेतृत्वात दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकर महाविद्यालयाची उभारणी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान तयार केले. तेव्हा त्याच्या काही मूळ प्रती तयार करण्यात आल्या होत्या. त्यापासून नंतर फोटो कॉपी तयार करून ती सर्व सदस्यांना वितरित करण्यात आली होती. त्यातील एक प्रत दादासाहेब गायकवाड यांनाही मिळाली होती. ती प्रत दादासाहेबांनी दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाला भेट दिली. तेव्हापासून ही प्रत आजही महाविद्यालयाच्या ग्रंथालयात सुरक्षित ठेवण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Original Constitution Copy: Select Locations, Nagpur's Deekshabhoomi Honored

Web Summary : The original Indian Constitution copy, a vital document, is preserved in select places, including Nagpur's Deekshabhoomi, gifted by Dadasaheb Gaikwad. This rare copy resides in Dr. Ambedkar College's library, a testament to Babasaheb's legacy and Gaikwad's dedication.
टॅग्स :nagpurनागपूरConstitution Dayसंविधान दिनDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी