शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

परवाना नूतनीकरणाकडे आॅटोचालकांची पाठ

By admin | Updated: December 2, 2015 03:26 IST

१९७७ नंतरचे रद्द झालेले व २००६ च्या पूर्वीचे आॅटो परवाने व बॅचधारकांना नवीन परवाने देण्याचा निर्णय तब्बल सात वर्षानंतर शासनाने घेतला.

मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद : नागपुरात २२३८ तर ग्रामीणमध्ये १६३९ परवाने रद्द होणार!नागपूर : १९७७ नंतरचे रद्द झालेले व २००६ च्या पूर्वीचे आॅटो परवाने व बॅचधारकांना नवीन परवाने देण्याचा निर्णय तब्बल सात वर्षानंतर शासनाने घेतला. परवाने घेणे सोयीचे जावे याकरिता वारंवार मुदत वाढीसह शुल्कात कपात व शिक्षणाची अटही रद्द केली. ३० नोव्हेंबर शेवटीची तारीख होती. परंतु शहर आणि ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) या नूतनीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. शहरात २२३८ तर ग्रामीणमध्ये १६३९ परवान्याला आॅटोचालकांनी पाठ दाखविली आहे. राज्यात सद्य:स्थितीत ७ लाख २६ हजार आॅटोरिक्षा परवाने आहेत. यातील १ लाख ४० हजार ६५ आॅटोरिक्षांचे परवाने परिवहन विभागाने रद्द केले होते. त्यांच्या नूतनीकरणाचा आग्रह आॅटोरिक्षा चालक संघटनांनी धरला होता. अखेर परिवहन विभागाने आपले जुने आदेश मागे घेत परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे नवे आदेश काढले. परवाना नूतनीकरणाची शेवटची मुदत ३१ आॅक्टोबर २०१५ देण्यात आली होती. नंतर ती वाढवून १६ नोव्हेंबर करण्यात आली होती. या दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या आॅटोरिक्षांवर जप्तीची मोहीमही सुरू केली, तरीही अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने तिसऱ्यांदा परिवहन विभागाने अंतिम मुदतीत वाढ करीत ती ३० नोव्हेंबर केली. या तारखेपर्यंत परवानाधारकांनी परवाना नूतनीकरण केले नाही तर त्यांचे परवाने कायमचे रद्द करण्याचे आदेशही काढले, परंतु तरीही देखील आॅटोचालकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)५० टक्केही प्रतिसाद नाही शहर आरटीओ व पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मिळून ४२२४ आॅटो परवानांचे नूतनीकरणाला मंजुरी मिळाली होती. सुरुवातीला १४७० आॅटोचालकांनी नूतनीकरण केले, परंतु आताच्या मोहिमेत फक्त २७३ परवान्यांचे नूतनीकरण झाले. यात कार्यालयाला ४३ लाख ५० हजार ५७४ रुपयांचा महसूल मिळाला तर पूर्व आरटीओला २४२ परवानाचे नूतनीकरण होऊन २९ लाख ९ हजार ५१० रुपयांचा महसूल मिळाला. दोन्ही मिळून १९८६ परवान्यांना चालक मिळाले. उर्वरित २२३८ परवाने आदेशानुसार रद्द होणार आहेत. नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयाचेही असेच चित्र आहे. १७७० परवान्यांना मंजुरी मिळाली असता केवळ १३१ परवान्यांचे वितरण झाले. तब्बल १६३९ परवाने अद्यापही पडून आहेत.