शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

गावांमध्ये तंत्रज्ञान पोहचणे आवश्यक

By admin | Updated: June 7, 2015 02:40 IST

देशाच्या विकासासाठी गावागावांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान पोहचणे आवश्यक आहे. यामुळे तेथील लोक सक्षम होतील. भूमी अधिग्रहण कायदा या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.

नितीन गडकरी : कापूस पऱ्हाटी व शेती कचऱ्याचे मूल्यवर्धन विषयावर चर्चासत्रनागपूर : देशाच्या विकासासाठी गावागावांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान पोहचणे आवश्यक आहे. यामुळे तेथील लोक सक्षम होतील. भूमी अधिग्रहण कायदा या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. गावात कंपन्या आल्या तर शेतकऱ्यांना रोजगार मिळेल. युवकांना मजबुरीने शहरात येऊन रिक्षा ओढण्याची गरज भासणार नाही. शेतकऱ्यांसाठी कोणते तंत्रज्ञान फायद्याचे आहे यावर काम होणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.कृषी मंत्रालय अंतर्गत आय.सी.ए.आर.-जी. टी. सी. सिरकॉट, नागपूर इंडियन सोसायटी फॉर कॉटन इम्प्रुव्हमेंट मुंबई, अ‍ॅग्रोप्लस फाऊंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कापूस पऱ्हाटी व शेती कचऱ्याचे मूल्यवर्धन आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. अमरावती रोड येथील राष्ट्रीय माती सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्युरोच्या डॉ. एस.पी. चौधरी सभागृहात आयोजित या चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथील कृषी वैज्ञानिक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, आयसीएआर मुंबईचे संचालक डॉ. पी.जी. पाटील, इंडियन सोसायटी फॉर इम्प्रुव्हमेंट मुंबईचे सचिव डॉ. ए.जे. शेख, अ‍ॅग्रोप्लस फाऊंडेशन नागपूरचे अध्यक्ष जी.एच. वैराळे उपस्थित होते.गडकरी म्हणाले, देशात मजूर, शेतकऱ्यांची स्थिती चांगली नाही. कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती तर चिंताजनक आहे. यावर विचार करून योग्य पाऊल न उचलल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञानासोबतच ‘इकोनॉमी वायोब्लिटी’चे होणेही आवश्यक आहे. देशात रोजगाराची समस्या मोठी आहे. आणि सर्वात जास्त रोजगार ग्रामीण भागात निर्माण करण्याची खरी गरज आहे. परंतु दुर्भाग्यपूर्ण मागील अनेक वर्षांपासून ज्या नीतीवर आम्ही चाललो त्यामुळे गावाचा विकास तर दूर राहिला, उलट तो खुंटला. परिणामी २८ टक्के लोकसंख्येला गावातून शहरात येणे भाग पडले. विदर्भातील शेतकऱ्यांची स्थिती चांगली नाही. अशा स्थितीत तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीतजास्त संधी उपलब्ध होतील असे कार्य करणे आवश्यक आहे. कार्यक्रमात कृषीवर आधारित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. आभार डॉ. ए.जे. शेख यांनी मानले.(प्रतिनिधी)