तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यानेच वाढविली अपंगत्वाची टक्केवारी

By Admin | Updated: July 3, 2014 00:53 IST2014-07-03T00:53:36+5:302014-07-03T00:53:36+5:30

जिल्हा परिषदेत बोगस अपंग शिक्षकाचे प्रकरण बाहेर आल्यानंतर आता तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने अपंगत्वाची टक्केवारी वाढविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माहिती अधिकाराने या

The taluka's medical officer also constitutes the percentage of disability | तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यानेच वाढविली अपंगत्वाची टक्केवारी

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यानेच वाढविली अपंगत्वाची टक्केवारी

बिंग फुटले : मेडिकल बोर्डाला मागितला अहवाल
सुरेंद्र राऊत - यवतमाळ
जिल्हा परिषदेत बोगस अपंग शिक्षकाचे प्रकरण बाहेर आल्यानंतर आता तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने अपंगत्वाची टक्केवारी वाढविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माहिती अधिकाराने या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे बिंग फुटले आहे.
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत देवकते यांनी माहिती अधिकारांतर्गत हा प्रकार उघडकीस आणला. बाभुळगाव येथे तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत डॉ. मोहन खडतकर यांनी १६ जून २००४ मध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढले. वैद्यकीय बोर्डाने त्यांना ४५ टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र दिले. याची नोंद जिल्हा शल्यचित्किसक कार्यालयातील रजिस्टरमध्ये आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्हा परिषद आरोग्य विभागात सादर केलेल्या अपंग प्रमाणपत्रात अपंगत्वाची टक्केवारी ५१ इतकी करण्यात आली आहे. अपंग प्रमाणपत्रामध्ये टक्केवारीच्या ठिकाणी खोडतोड करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. डॉ. मोहन खडतकर यांचे अपंगत्व ४५ की ५१ टक्के यासाठी वैद्यकीय मंडळाने पुर्नतपासणी करून त्याचा अहवाल पाठवावा, अशी सूचना दिली आहे.
अपंगत्वाची टक्केवारी वाढवून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने शासनाच्या अनेक सवलतींचा लाभ घेतला आहे. वेतनातील मासिक लाभ, व्यवसाय रोध भत्ता, आयकर करातील सवलत तसेच शासनाच्या इतर आर्थिक सवलतींचा लाभ घेतला आहे. याची चौकशी करून दिशाभूल करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: The taluka's medical officer also constitutes the percentage of disability