शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील ९ जागांवर स्वाभिमानीचा दावा

By admin | Updated: July 20, 2014 23:30 IST

विधानसभा निवडणुकीत विदर्भातील ९ जागा लढण्यास स्वाभीमानी शेतकरी संघटना तयार आहे.

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीत विदर्भातील ९ जागा लढण्यास स्वाभीमानी शेतकरी संघटना तयार आहे. या जागांसाठी महायुतीकडे दावा केला जाईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, खा. राजू शेट्टी यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. लोकसभा निवडणुकीनंतर खा. राजू शेट्टी हे चिखली येथील एल्गार मेळाव्यानिमित्त प्रथमच विदर्भाच्या दौर्‍यावर आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. विदर्भातील चिखली, खामगाव, बाळापूर, कारंजा लाड, वणी, वरूड, रामटेक, देवळी आणि काटोल हे ९ विधानसभा मतदारसंघ लढण्यास सक्षम उमेदवार संघटनेकडे असल्याचे खा. राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले. विदर्भातील ९ जागांसह राज्यातील ६५ विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थिती मजबूत आहे. त्यामुळे यासंदर्भातही संघटना महायुतीशी चर्चा करणार आहे. महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतरच कोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करायचे, याबाबत निर्णय घेण्यात येईल. लोकसभेप्रमाणे विधानसभेचाही जागा वाटपाचा तिढा सोडविला जाईल, असे ते म्हणाले. विदर्भातील शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्यांवर खा.शेट्टी यांनी चिंता व्यक्त केली. शेतकर्‍यांचे विज बिल माफ करावे, त्यांचा सातबारा कोरा करावा, डॉ. स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना ५0 हजार रूपये प्रति एकर नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यासाठी संघटना लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.कांदे, बटाटे यांचा जिवनावश्यक वस्तुंमध्ये समावेश केल्यामुळे, या उत्पादनाला हमी भाव देण्याची जबाबदारीही केंद्र सरकारची असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांचे ७२ हजार कोटी रूपये माफ केल्याचा दावा केंद्रातील युपीए सरकारकडून केला जातो. प्रत्यक्षात हा आकडा ५२ हजार कोटी रूपये असून, उद्योगपतींना मात्र २७ हजार कोटी रूपये शासनाने माफ केले असल्याचा आरोप त्यांनी केला. सिंचन घोटाळा, शेतकर्‍यांच्या मालास हमी भाव या मुद्यांवर विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.बुलडाणा जिल्हा बँकेच्या संचालकांवरिूध्द कारवाई करण्याची मागणी खा. शेट्टी यांनी यावेळी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कोणत्याही गावगुंडांना भित नाहीत. काँग्रेसने त्यांच्या आमदाराला आवरावे, अन्यथा काँग्रेसच्या नेत्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराही खा. शेट्टी यांनी दिला. यावेळी संघटनेचे स्थानिक तसेच प्रदेश स्तरावरील नेतेही उपस्थित होते.