शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कार परत करणाऱ्यांच्या हेतूबद्दल संशय

By admin | Updated: November 21, 2015 03:28 IST

पुरस्कार परत करून सरकारचा निषेध करण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून आपण अनुभवत आहोत.

सदानंद मोरे : स्व. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार प्रदाननागपूर : पुरस्कार परत करून सरकारचा निषेध करण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून आपण अनुभवत आहोत. १९९८ मध्ये मला दिलेला साहित्य अकादमीचा पुरस्कार २०१५ च्या सरकारच्या निषेधात मी का परत करावा, हे मला तार्किक वाटत नाही. निषेध करण्याचे अनेक प्रकार आहेत. परंतु पुरस्कार परत करणे म्हणजे पुरस्कार देणाऱ्यांच्या भावनेचा अनादर करणे होय. त्यामुळे सरकारच्या निषेधात पुरस्कार परत करणाऱ्यांच्या हेतूबद्दल मला संशय येतोय, असे मत प्रसिद्ध लेखक, समीक्षक व संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. मारवाडी फाऊंडेशनतर्फे डॉ. सदानंद मोरे यांना शुक्रवारी स्व. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात प्रदान करण्यात आला. याप्रसंगी पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मारवाडी फाऊंडेशनचे अध्यक्ष खा. अजय संचेती, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध विचारवंत व ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत भाऊ तोरसेकर यांच्याहस्ते डॉ. मोरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराच्या स्वरूपात शाल, श्रीफळ, एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी मारवाडी फाऊंडेशनचे गिरीश गांधी, सत्यनारायण नुवाल, पूनमचंद मालू, नंदकिशोर सारडा, विजय मुरारका, डी.आर. मल आदी उपस्थित होते. यावेळी मोरे यांनी मारवाडी समाजाचा राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत करण्यात, समाज सुधारणेत व मराठी साहित्यातील योगदानाबद्दलचे काही दाखले दिले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना ते म्हणाले की, परखडपणा, रोखठोकपणा त्यांच्या स्वभावात होता. जोपर्यंत समाज आहे, तोपर्यंत प्रबोधनकारांचे कार्य राहील, अशी भावना व्यक्त केली. यावेळी भाऊ तोरसेकर यांनीही पुरस्कार परत करणाऱ्यांच्या भूमिकेचा तिखट समाचार घेतला. ते म्हणाले की, पुरस्कार हे कोणी दिलेले बक्षीस नसते. पुरस्कारामागे आपल्या कार्याची पाठ थोपटणे हा उद्देश असतो. पुरस्कार परत करणाऱ्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी पुरस्कार देणाऱ्यांचा अपमान केला आहे. ज्यांनी पुरस्कार परत केला, त्यांना पुरस्काराचा अर्थच कळला नाही. यावेळी उल्हासदादा पवार म्हणाले की, जातीपातीच्या पलीकडे जाऊन प्रबोधनकारांनी समाजाच्या विकासासाठी काम केले आहे.आज समाजात वंशवाद, जातीवाद वाढला आहे. प्रत्येकजण परिवर्तन हा शब्द वापरतो आहे. परंतु परिवर्तनातच वर्तन हा शब्द आहे. वैयक्तिक सद्वर्तन व सामाजिक भान ठेवल्यास परिवर्तन घडू शकते. हेच कार्य डॉ. मोरे करीत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात गिरीश गांधी म्हणाले मारवाडी फाऊंडेशन माणसामाणसाला जोडण्यासाठी जातीच्या बाहेर जाऊन काम करीत आहे. पुरस्कार देणे हा राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून केलेला छोटासा प्रयत्न आहे. कार्यक्रमाचे संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले. (प्रतिनिधी)बुद्धिवादी म्हणविणारे सुधारक पोकळ आहेतआजचे बुद्धीवंत जे स्वत:ला सुधारक समजतात, ते इतिहासाच्या सगळ्या सुधारकांना धोंडे मारतात आणि तेच पुढे महात्मा म्हणून मिरवितात. सुधारक हा समाजासाठी असतो, तो स्वत:चा विचार करीत नाही. बुद्धीवादी म्हणविणारे सर्व सुधारक पोकळ आहेत, असे मत भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले. आज समाजात सुधारक, प्रबोधनकार राहिले नसल्याने साधु, संत, स्वामी बोकाळले आहे. प्रबोधनकार हे दुखण्यावर बोट ठेवत होते. त्यामुळे आजच्या प्रस्थापित बुद्धीवादींमध्ये त्यांना स्थान मिळत नाही.