शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत क्राईम कंट्रोल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम

By admin | Updated: July 13, 2015 02:37 IST

उपराजधानीतील सर्व पोलीस ठाण्यात १४ जुलैनंतर क्राईम कंट्रोल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) नुसार कामकाज केले जाईल,

राज्यात सर्वप्रथम नागपुरात अंंमलबजावणी : सीपींची माहितीनागपूर : उपराजधानीतील सर्व पोलीस ठाण्यात १४ जुलैनंतर क्राईम कंट्रोल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) नुसार कामकाज केले जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. सीसीटीएनएसच्या अंमलबजावणीचा मान राज्यात सर्वप्रथम नागपूर पोलिसांना मिळणार असल्याचेही यादव यांनी सांगितले. देशातील सर्व पोलीस ठाणी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालये आॅनलाईन पद्धतीने संलग्नित व्हावी, यासाठी केंद्र शासनाने सीसीटीएनएसचा उपक्रम तीन वर्षांपूर्वी सुरू केला. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली. अनेक शहरात आणि अनेक राज्यात प्राथमिक टप्पा पूर्ण व्हायचा असताना नागपुरात या प्रणालीची पूर्तता झाली असून, १३ जुलैला १२ आणि १४ जुलैला ११ पोलीस ठाण्यात ही प्रणाली सुरू होईल, असे यादव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)काय आहे फायदेदेशात एकूण किती गुन्हेगार आहेत, फरार किती आहेत, किती बेपत्ता आहेत, किती अनोळखी मृतदेह सापडले, त्याची एकत्रित माहिती सर्वांना पोलीस ठाण्यात बसून बघायला मिळेल. गुन्हेगारांची तातडीने ओळख पटविण्यातही पोलिसांना सोयीचे होईल. घरबसल्या मागा परवानगीया प्रणालीतून १११ प्रकारच्या परवानगीचे अर्ज आहेत. त्यामुळे कुणाला कोणती परवानगी पाहिजे, त्यासाठी पोलीस ठाणी किंवा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारण्याची गरज राहाणार नाही. घरबसल्या अर्ज डाउनलोड करून परवानगी मिळवता येईल. टाळाटाळ होणार नाहीआॅनलाईन तक्रार करता येणार असल्यामुळे तासन्तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याच्या तसेच तक्रार नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ गैरप्रकाराला आळा बसेल. आम्हाला तक्रारच मिळाली नाही, असे कोणताच पोलीस बोलू शकणार नाही.साडेतीन हजार प्रशिक्षितया प्रणालीचे प्रशिक्षण आणि मेंटेनन्स विप्रो तसेच बीएसएनएल यांच्याकडे आहे. प्रणालीचा चांगल्या प्रकारे वापर करण्यासाठी ३५०० पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना चांगली सुविधा देण्याचा यामागे उद्देश आहे. सुरुवातील तांत्रिक बाबींमुळे अडचणी येऊ शकतात. मात्र, नंतर सर्व सुरळीत होईल, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. यावेळी सहआयुक्त राजवर्धन सिन्हा, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आणि सर्व उपायुक्त हजर होते.