शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

सनी देओल यांनी घेतली नागपुरात गडकरींची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:44 PM

चित्रपट अभिनेता व खासदार सनी देओल यांनी मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन वाहतूक तसेच सुक्ष्म व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सनी देओल यांनी गडकरी यांच्या प्रकृतीबाबत आस्थेने विचारपूस केली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : चित्रपट अभिनेता व खासदार सनी देओल यांनी मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन वाहतूक तसेच सुक्ष्म व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सनी देओल यांनी गडकरी यांच्या प्रकृतीबाबत आस्थेने विचारपूस केली आणि राजकीय व इतर विषयावर चर्चा केली. त्यांनी गडकरी कुटुंबासोबत स्नेहभोजनही केले.मातृभूमी प्रतिष्ठान, रेशीमबागतर्फे बुधवारी सकाळी होणाऱ्या सामूहिक वंदेमातरम कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सनी देओल नागपूरला आले आहेत. रात्री डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचल्यानंतर ते थेट रात्री ९.१५ वाजताच्या दरम्यान नितीन गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी पोहचले. गडकरी यांनी त्यांना घरी भोजनाचे निमंत्रण दिले होते व सनी यांनी ते सहर्ष स्वीकारले. घरी पोहचल्यानंतर गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी व मातृभूमी प्रतिष्ठानचे छोटू भोयर उपस्थित होते. यानंतर सनी देओल यांनी गडकरी कुटुंबाच्या कुलदेवतेचे दर्शन घेतले. त्यांनी गडकरी यांच्या प्रकृतीची चौकशी केली व देशहितासाठी काम करताना आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची विनंती केली. राजकीय व इतर विविध विषयावर काही काळ चर्चा केल्यानंतर त्यांनी गडकरी व कुटुंबासोबत स्नेहभोजन घेतले. सनी देओल जवळपास दोन तास गडकरी यांच्या निवासस्थानी होते व त्यानंतर ते थेट हॉटेलकडे रवाना झाले.

टॅग्स :Sunny Deolसनी देओलNitin Gadkariनितीन गडकरी