विद्यार्थिनीचा परीक्षा केंद्रावर मृत्यू

By Admin | Updated: January 3, 2016 03:36 IST2016-01-03T03:36:43+5:302016-01-03T03:36:43+5:30

परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीचा पेपर सोडविण्यापूर्वीच मृत्यू झाला. एलएडी कॉलेज परिसरात शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास

Student's examination center death | विद्यार्थिनीचा परीक्षा केंद्रावर मृत्यू

विद्यार्थिनीचा परीक्षा केंद्रावर मृत्यू


नागपूर : परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीचा पेपर सोडविण्यापूर्वीच मृत्यू झाला. एलएडी कॉलेज परिसरात शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. प्राजक्ता सदाशिव डफरे (वय १९) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती दाभ्याच्या इनकम टॅक्स सोसायटीत राहात होती.
धरमपेठ सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी असलेली प्राजक्ता आज सकाळी पेपर सोडवण्यासाठी एलएडीच्या केंद्रावर आली. रूम नं. २०३ च्या दारासमोर अचानक ती चक्कर येऊन पडली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आरडाओरड केली. तिला वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्राजक्ताला मृत घोषित केले. संजय संतोष गिरी यांच्या सूचनेवरून अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृत्यू नेमका कशाने झाला ते उघड झाले नाही. १० वर्षांपूर्वी प्राजक्ताच्या हार्टचा व्हॉल्व बदलण्यात आला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Student's examination center death