शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी संघटनांचा ‘हल्लाबोल’

By admin | Updated: March 27, 2015 01:55 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात गुरुवारी विधीसभेची बैठक सुरू असताना परिसर विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीने दणाणून गेला होता.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात गुरुवारी विधीसभेची बैठक सुरू असताना परिसर विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीने दणाणून गेला होता. पुनर्मूल्यांकन तसेच परीक्षा विभागाशी संबंधित मागण्यासांठी ४ विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते एकाच वेळी प्रशासकीय इमारत परिसरात धडकले. यात ‘अभाविप’ (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद), ‘एनएसयूआय’ (नॅशनल स्टुडन्ट्स युथ कॉंग्रेस), राष्ट्रवादी विद्यार्थी परिषद व ‘मनविसे’ (महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना) या संघटनांचा समावेश होता. वातावरण चिघळू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.विद्यापीठाच्यावतीने आकारण्यात येणारे अमाप परीक्षा शुल्क, फेरमूल्यांकनाचा प्रश्न, न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत महाविद्यालयांकडून माहितीपुस्तकासाठी आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्क, फेरमूल्यांकनात होणारी विद्यार्थ्यांची लूट, विद्यापीठ वसतिगृहात राहणारे अनधिकृत विद्यार्थी अशा विविध प्रश्नावर विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले व विधीसभा सदस्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जे विद्यार्थी पुनर्मूल्यांकनाच्या निकालामध्ये उत्तीर्ण होतात अशा सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पुनर्मूल्यांकन शुल्क परत द्यावे अशी मागणी ‘अभाविप’ने केली. निकाल लवकर लावावे, विद्यार्थी वसतिगृहामध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करावी, कमवा आणि शिका योजनेतील विद्यार्थ्यांचा कार्य करण्याचा कालावधी वाढविण्यात यावा अशा मागण्या राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे करण्यात आल्या. कुलगुरू निवडीसंबंधी आक्षेप नोंदवित ‘मनविसे’च्या कार्यकर्त्यांनीदेखील घोषणाबाजी केली. तर एका खासगी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याच्या मुद्यावर ‘एनएसयूआय’चे कार्यकर्ते आक्रमक झाले.