एसटीचा एनसीएमसी कार्ड घोटाळा, ठिकठिकाणांहून अनेक तक्रारी; महामंडळाकडून संबंधित एजंटवर कारवाईचे आदेश

By नरेश डोंगरे | Updated: May 14, 2026 20:22 IST2026-05-14T20:21:41+5:302026-05-14T20:22:15+5:30

Nagpur : प्रवासभाड्यात सवलत मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांना बंधनकारक केलेल्या एनसीएमसी कार्डच्या नोंदणी आणि वितरणात एजंटकडून मोठा घोटाळा होत असल्याच्या तक्रारी ठिकठिकाणाहून एसटी महामंडळाकडे होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

ST's NCMC card scam, many complaints from different places; Corporation orders action against the concerned agent | एसटीचा एनसीएमसी कार्ड घोटाळा, ठिकठिकाणांहून अनेक तक्रारी; महामंडळाकडून संबंधित एजंटवर कारवाईचे आदेश

ST's NCMC card scam, many complaints from different places; Corporation orders action against the concerned agent

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर :
प्रवासभाड्यात सवलत मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांना बंधनकारक केलेल्या एनसीएमसी कार्डच्या नोंदणी आणि वितरणात एजंटकडून मोठा घोटाळा होत असल्याच्या तक्रारी ठिकठिकाणाहून एसटी महामंडळाकडे होत असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, नागपुरातील घोटाळ्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच महामंडळाच्या वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली असून, घोटाळा करणाऱ्या एजंटचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

समाजातील वेगवेगळ्या घटकांना एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. ही सवलत मिळवण्यासाठी प्रवाशाला संबंधित ओळखपत्र दाखवावे लागते. पुर्वी आधार कार्ड, वोटींग कार्ड तसेच अन्य शासनमान्य कार्ड दाखवल्यास वाहक त्या प्रवाशाला सवलतीचे तिकिट देत होता. मात्र,

चार वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने 'स्मार्ट' कार्डची योजना सुरू केली. ते बंधनकारक करून स्मार्ट कार्ड दाखविले तरच प्रवास भाड्यात सवलत मिळेल, अशी अट महामंडळाने घातली होती. मात्र, ही योजना बारगळ्यानंतर आता सवलत मिळवण्यासाठी एनसीएमसी कार्डची सक्ती महामंडळाने केली आहे. कार्डचे नोंदणीकरण आणि वितरण करण्याकरता मे. ईबिक्स टेक्नॉलॉजी व एनएसडीएल पेमेंट बँक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार, परिवहन महामंडळाचे राज्यभरातील आगार, बसस्थानके आणि आगाराच्या हद्दीबाहेर एजंट नियुक्त करण्यात आले. त्यांच्याकडे हे कार्ड तयार करून घेण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. एका कार्डसाठी महामंडळाने एजंटला १९९ रुपये घेण्याचे आदेश दिले. मात्र, अनेक ठिकाणी हे कार्ड तयार करून देण्यासाठी एजंट जास्तीचे पैसे घेत आहेत. नागपुरात आधी २२० आणि नंतर २५० रुपये घेतले जात होते. अशा प्रकारे कार्डच्या बनवाबनवीत लाखोंचा घोटाळा होत असल्याची माहिती कळताच 'लोकमत'ने ११ आणि १२ मे च्या अंकात ठळकपणे वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे संबंधितात एकच खळबळ उडाली. या वृत्तामुळे अशाच तक्रारी ठिकठिकाणाहून मोठ्या प्रमाणात होत असल्याची उपरती महामंडळाच्या वरिष्ठांना झाली. त्यामुळे एसटीचे महाव्यवस्थापक (वाहतूक) नितीन मैंद यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रकांना पत्र देऊन, अशा प्रकारे जास्त शुल्क घेणाऱ्या एजंटचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

महिला-मुलींना कार्डची गरजच काय ?

लोकमतने एनसीएमसी कार्ड संबंधाने वृत्त प्रकाशित करताच प्रवाशांच्या तीव्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसह महिला, मुलींना सरसकट ५० टक्के प्रवास भाडे सवलत जाहिर केली आहे. त्यामुळे महिला-मुलींना कार्ड बनविण्याची गरजच काय, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. तर, प्रवासभाड्यात ५० टक्के सूट मिळवण्यासाठी महिला-मुलींचा वेष धारण करून दुसरे कुणी प्रवास करणार काय, असा प्रश्नही अनेक संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Web Title : एसटी निगम का एनसीएमसी कार्ड घोटाला: शिकायतें सामने आईं, एजेंटों पर कार्रवाई का आदेश

Web Summary : एसटी निगम के एनसीएमसी कार्ड पंजीकरण में धोखाधड़ी की शिकायतें आईं। एजेंटों ने कार्ड के लिए अधिक शुल्क लिया, जिससे घोटाला हुआ। खुलासे के बाद, निगम ने अधिक शुल्क लेने वाले एजेंटों के खिलाफ कार्रवाई का आदेश दिया, जिसमें लाइसेंस रद्द करना भी शामिल है।

Web Title : ST Corporation's NCMC Card Scam: Complaints Emerge, Action Ordered Against Agents

Web Summary : Complaints of fraud in ST Corporation's NCMC card registration surfaced. Agents overcharged for cards, leading to a scam. Following exposure, the corporation ordered action against agents involved in overcharging, including license cancellations.

टॅग्स :nagpurनागपूर