शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठीचा संघर्ष पेटणार

By admin | Updated: March 27, 2015 01:57 IST

महापालिकेच्या उदासिनतेमुळे गेल्या २२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठीचा प्रश्न आणखी पेटणार आहे.

नागपूर : महापालिकेच्या उदासिनतेमुळे गेल्या २२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठीचा प्रश्न आणखी पेटणार आहे. या स्मारकासाठी मागील २२ वर्षांपासून विविध आंबेडकरी संघटना संघर्ष करीत आहेत. त्यापैकीच एक असलेल्या स्मारक संघर्ष समितीने येत्या १४ एप्रिलपर्यंत स्मारकाचा मुद्दा न सुटल्यास जागा ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता. त्यावर समिती ठाम असून १४ एप्रिलला स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.धंतोली येथील पटवर्धन मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक उभारण्याची घोषणा महापालिकेने २२ वर्षांपूर्वी केली होती. त्यानंतर दरवर्षी महापलिकेच्या अर्थसंकल्पात स्मारकासाठी निधीची तरतूदसुद्धा केली जात होती, परंतु स्मारकाचे काम मात्र सुरू झाले नाही. सध्या महापालिकेच्या जागेच्या लीजच्या नूतनीकरणाचा प्रश्न राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. असे असले तरी आतापर्यंत अनेकदा आंबेडकरी जनतेने स्मारकाच्या निर्मितीसाठी सनदशीर मार्गाने आंदोलने केली, मात्र महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे आंबेडकरी संघटनांमध्ये तीव्र असंतोष आहे. महापालिकेच्या जागेवर ज्याप्रमाणे श्रमिक पत्रकार भवन, शासकीय ग्रंथालय, यशवंत स्टेडियमवरील दुकाने, स्टार बस इत्यादीसाठीची जागा उपलब्ध आहे तर स्मारकासाठीच जागा उपलब्ध का करून दिली जात नाही, असा प्रश्न आंबेडकरी जनतेद्वारा विचारला जात आहे. तसेच या प्रश्नावर आंबेडकरी नेते गप्प असल्याबद्दलसुद्धा आंबेडकरी जनतेमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. यासंदर्भात डॉ. बाबसाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक संघर्ष समितीचे दिनेश अंडरसहारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जन्मशताब्दी स्मारकासाठी आजवर सनदशीर मार्गानेच लढा देत आहोत. महापौर, मुख्यमंत्री सर्वांनाच भेटून झाले. आंबेडकरी जनता ही कायद्यानुसार चालणारी आहे. आजवर आम्ही कायद्यानुसारच मागणी रेटून धरली. १४ तारखेलासुद्धा आम्ही सनदशीर मार्गानेच आंदोलन करणार आहोत. त्यासाठी रीतसर परवानगी घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच रिपब्लिकन मुव्हमेंटचे अध्यक्ष नरेश वाहाणे यांनीसुद्धा हा विषय लावून धरला आहे. यासंबंधात ते म्हणाले की, भाजपातर्फे राज्यात सत्ता आल्यास आम्ही हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले जात होते. आता केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही भाजपचीच सत्ता आहे. तेव्हा हा प्रश्न सोडविण्यात कुठली अडचण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत नागपूरचे असून त्यांना या विषयाची चांगली जाण आहे. तेव्हा त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. लीजचा प्रश्न राज्य शसनाकडे प्रलंबित असल्याने आंबेडकरी जनतेच्यावतीने पुन्हा एकदा संयुक्त शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन विनंती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)