शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांच्या गुप्त बैठकीवरून वादळ

By admin | Updated: May 14, 2014 01:30 IST

जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाचे पुनर्नियोजन करताना सदस्यांना विश्‍वासात न घेता अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी गुप्त बैठक घेतली.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाचे पुनर्नियोजन करताना सदस्यांना विश्‍वासात न घेता अध्यक्ष व पदाधिकार्‍यांनी मंगळवारी गुप्त बैठक घेतली. यात अर्थसंकल्पातील उपलब्ध तरतूद व मागील वर्षाचा अखर्चित निधी आपल्या सर्कलमध्ये कसा नेता येईल. यावर दोन तास मंथन झाल्याची चर्चा आहे. यावरून जि.प.मध्ये वादळ उठले आहे.

अध्यक्ष संध्या गोतमारे, उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्यासह सभापती वंदना पाल, वर्षा धोपटे, दुर्गावती सरियाम व नंदा लोहबरे आदी या बैठकीला उपस्थित होते. अर्थसंकल्पाचे पुनर्नियोजन व मागील वर्षाचा अखर्चित निधी यावर चर्चा झाली. महिला व बालकल्याण विभागाचा निधी मोठय़ा प्रमाणात अखर्चित आहे. नियोजनात अखर्चित निधी समाविष्ट न केल्याने घोळ निर्माण झाला आहे. अर्थसंकल्पातील तरतूद व खर्चाचे नियोजन यात तफावत असल्याने याची जुळवाजुळव सुरू आहे. वास्तविक सेस फंडातील विभागावार उपलब्ध निधीचे नियोजन करण्याचे अधिकार त्या-त्या समित्यांना आहेत.

जि.प.च्या सेस फंडातील निधीचे वाटप करताना सदस्यांवर अन्याय होणार नाही याची जबाबदारी पदाधिकार्‍यांची असते. परंतु अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते,सत्ता पक्षनेते यांना विश्‍वासात घेतले नाही. पक्षातील ज्येष्ठ सदस्यांना विचारणा करता त्यांनाही या बैठकीची कल्पना नव्हती. वृत्तपत्रातील बातमीतून माहिती मिळाल्याची सांगून त्यांनी या गुप्त बैठकीवर नाराजी व्यक्त केली. जि.प.चा कारभार पारदश्री असावा असे मत व्यक्त केले. (प्रतिनिधी)