शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

स्मारक व तडजोडीच्या मुद्यावरून सभेत वादळ

By admin | Updated: June 19, 2016 03:00 IST

पाणीपट्टी थकबाकीदारांना बिलात ५० टक्के सवलत योजना आणली आहे. एकमुस्त तडजोड शुल्क भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

महापालिकेची सोमवारी सभा : सत्तापक्षाला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक आक्रमकनागपूर : पाणीपट्टी थकबाकीदारांना बिलात ५० टक्के सवलत योजना आणली आहे. एकमुस्त तडजोड शुल्क भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु यामुळे नियमित बिल भरणाऱ्यांवर अन्याय होत आहे. तसेच यशवंत स्टेडियमच्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आरक्षित असलेल्या जागेवर सिटी ट्रान्सपोर्ट स्टँड उभारण्याचा प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी आणला आहे. या मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याचे पडसाद या सभेत उमटणार असल्याने ही सभा चांगलीच वादळी ठरण्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत. थकीत पाणीपट्टीचा विषय विरोधी सदस्यांनी चर्चेसाठी दिला आहे. शुक्रवारी सत्तापक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. यात पक्षाच्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली तर शनिवारी दुपारी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची बैठक झाली. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी पक्षाच्या नगरसेवकांना वेळेत सभागृहात उपस्थित होण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी जेव्हा-जेव्हा त्यांनी पक्षाच्या सदस्यांना वेळेत सभागृहात उपस्थित होण्याचे निर्देश दिले तेव्हा-तेव्हा सभागृहात गोंधळ झाला आहे. त्यामुळे सोमवारची सभा चांगलीच वादळी ठरण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुका विचारात घेता महापालिकेतील सत्तापक्ष व विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याचे पडसाद महापालिकेतील राजकीय घडामोडीवर होत आहे. आंबेडकरवादी संघटना, बसपा, भारिप बहुजन महासंघ यांनी सिटी ट्रान्सपोर्टला स्मारकाची जागा देण्याला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे सभागृहातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)