शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही बालविवाह

By admin | Updated: April 5, 2017 02:13 IST

सावित्रीबाई, जोतीबा फुले यांच्यापासून अनेक महापुरुषांनी बालविवाहासारख्या कुप्रथेला मूठमाती देण्यासाठी संघर्ष केला.

तीन वर्षात आठ गुन्हे दाखल : बालकांच्या संरक्षणाची यंत्रणा हरविली कुठे ? मंगेश व्यवहारे   नागपूर सावित्रीबाई, जोतीबा फुले यांच्यापासून अनेक महापुरुषांनी बालविवाहासारख्या कुप्रथेला मूठमाती देण्यासाठी संघर्ष केला. आज महाराष्ट्र शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात प्रगती करतो आहे. मोबाईलवर एक क्लीक करून जग जवळ आणणारा हा आधुनिक काळ, मात्र या काळात पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाह होत आहेत. तेही स्मार्ट सिटीची बिरुदावली मिरवणाऱ्या नागपूर शहरात ही कुप्रथा जन्म घेत असेल तर याला सामाजिक व सांस्कृतिक अधोगती म्हणावे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. होय, नागपूर शहरात गेल्या तीन वर्षात बालविवाहाचे आठ गुन्हे दाखल झाले आहेत. हा धक्कादायक खुलासा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालयाकडून केला गेला आहे. कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षात शहरातील विविध पोलीस ठाण्यात बालविवाहाचे आठ गुन्हे दाखल झाले आहेत. यात धंतोली ठाण्यात दोन, कोतवालीमध्ये एक, नंदनवन एक, कामठी एक, जरीपटका एक व यशोधरानगर ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद आहे. बालविवाहास गरिबी, आमिष व लहान वयात मुलांमध्ये पे्रमाबाबत वाढते आकर्षण या गोष्टी कारणीभूत ठरत आहे. परंतु बाल विवाहाच्या रोकथांबसाठी तहसीलदार, ग्रामविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केले आहे. परंतु या यंत्रणा बालविवाह या विषयावर फारशा गंभीर दिसत नाही. त्यामुळे समाजात बालविवाह होत असतानाही बरेचदा त्या सामोर येत नाही. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ मध्ये दंडात्मक आणि न्यायालयीन शिक्षेचीसुद्धा तरतूद आहे. आज समाज पुढारलेला आहे, शिक्षित झाला आहे. बालविवाह प्रतिबंधात्मक कायदे बनलेले आहे, असे असतानाही नागपूरसारख्या शहरात बालविवाह होणे दु:खद बाब आहे. नुकताच २५ मार्च रोजी यशोधरानगर ठाण्यात पुन्हा बालविवाहाचा गुन्हा दाखल झाला. चाईल्ड लाईन या संस्थेद्वारे जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी विजयसिंग परदेसी यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी बालविवाह झालेल्या मुलीला आरोपींच्या घरातूनच ताब्यात घेतले. तिला शासकीय मुलींचे बालगृह येथे ठेवण्यात आले आहे. बालविवाहाला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. स्लममध्ये याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. परंतु यावर रोखथांब करण्यासाठी शासनाने ज्या यंत्रणांना जबाबदारी दिली आहे, त्यांनी समन्वय साधून काम केल्यास आजही घडणाऱ्या बालविवाहासारख्या प्रकाराला आळा घालता येईल. पुढे आलेल्या या घटना केवळ जिल्हा बाल संरक्षण कक्षामुळे आल्या आहेत. - मुस्ताक पठाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी