शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोराडी वीज प्रकल्पातील नववा संच सुरू

By admin | Updated: January 17, 2015 02:48 IST

कोराडी विस्तारित वीज प्रकल्पातील नवव्या संचाने राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शुक्रवारी प्रकल्प आवारात आयोजित कार्यक्रमात प्रदीपन करण्यात आले.

नागपूर : कोराडी विस्तारित वीज प्रकल्पातील नवव्या संचाने राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शुक्रवारी प्रकल्प आवारात आयोजित कार्यक्रमात प्रदीपन करण्यात आले. हा संच आॅगस्ट २०१५ मध्ये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कोराडी विस्तारित वीज प्रकल्पात ८, ९ आणि १० असे वीज निर्मितीचे तीन संच आहेत. यातील नवव्या संचाची वीज निर्मिती क्षमता ६६० मेगावॅट असून, या संचाचे क्रियान्वयन मे- २०१५ मध्ये होणे अपेक्षित आहे. शिवाय, संच क्रमांक-१० चे क्रियान्वयन मार्च २०१५ मध्ये होणे अपेक्षित आहे. नवव्या संचातून आॅगस्ट २०१५ मध्ये पूर्ण क्षमतेने विजेचे उत्पादन होणार आहे. या प्रकल्पातील तिन्ही संचाचे क्रियान्वयन झाल्यानंतर उपलब्ध संसाधनांचा सुजाण व सुयोग्य वापर करून महानिर्मितीतर्फे लवकरच क्षमता विस्ताराधारे विजेची मागणी पूर्ण करण्यात येईल, असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
कोराडी विस्तारित वीज प्रकल्पाची एकूण क्षमता १९८० मेगावॅटची आहे. या प्रकल्पातील तिन्ही संचाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या तिन्ही संचांचे टप्प्याटप्प्याने क्रियान्वयन करण्यात येणार आहे. यातील संच क्रमांक - ८ चे ११ सप्टेंबर २०१४ रोजी यशस्विरीत्या प्रदीपन करण्यात आले. सध्या स्टीम ब्लोविंगची प्रक्रिया सुरू आहे. मार्च २०१५ मध्ये या संचाचे क्रियान्वयन अपेक्षित आहे. संच क्रमांक ८ आणि ९ ची एकूण वीज उत्पादन क्षमता १३२० मेगावॅट असून, या दोन्ही संचाचे आॅगस्ट २०१५ पर्यंत करण्यासंदर्भात नियोजन करणे सुरू आहे.
हा प्रकल्प सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित राज्यातील पहिला प्रकल्प आहे. या संचाची कार्यक्षमता अधिक असून, कोळशाचा वापर कमी केला जात असल्याने प्रदूषणावर नियंत्रण मिळविले जाणार आहे.
यासाठी जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून बॉयलर व टर्बाईन उभारण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रसंगी महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांच्यासह प्रकल्पातील सर्व अभियंते, कर्मचारी, कंत्राटदार, उपकंत्राटदार प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)