नागपूर : जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतीही अडचण पार करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण नागपूरच्या शांभवीने घालून दिले आहे. लहानपणी आजारपणामुळे ऐकण्याची क्षमता गेल्याने केवळ ओठांच्या हालचालींवरून शिक्षण घेत शांभवीने दहावीच्या परीक्षेत तब्बल 94.2 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शांभवीला आवाज ऐकू येत नसल्यामुळे तिच्यासमोर शिक्षणाचे मोठे आव्हान होते. मात्र तिने हार न मानता शिक्षक आणि पालकांच्या मदतीने ‘लिप रीडिंग’ अर्थात ओठांच्या हालचाली समजून अभ्यास करण्याची पद्धत आत्मसात केली. वर्गात शिक्षक काय शिकवत आहेत हे ती त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि ओठांच्या हालचालींवरून समजून घेत असे.
तिच्या या यशामागे आई-वडिलांचे योगदानही मोठे आहे. त्यांनी शांभवीला सामान्य मुलांच्या शाळेत ठेऊन मुलीला सक्षम बनवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. नियमित सराव, अभ्यासातील सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर शांभवीने हे यश मिळवले.
दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवल्यानंतर शांभवीवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून, शारीरिक अडचणी या यशाच्या आड येऊ शकत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Web Summary : Nagpur's Shambhavi, overcoming hearing loss by lip-reading, scored 94.2% in her tenth-grade exams. Her parents' support and diligent study habits were crucial to her success. She serves as an inspiration, proving physical challenges are surmountable with determination.
Web Summary : नागपुर की शांभवी ने होंठों की गति से सीखकर दसवीं कक्षा में 94.2% अंक प्राप्त किए। बचपन में सुनने की क्षमता खोने के बावजूद, उन्होंने शिक्षक और माता-पिता की मदद से यह उपलब्धि हासिल की। उनकी सफलता प्रेरणादायक है।