शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

भावपूर्ण सादरीकरणाने रंगलेली ‘श्रीकृष्ण गीतांजली’

By admin | Updated: August 14, 2014 01:24 IST

भगवान श्रीकृष्ण म्हणजे भारतीयांचे आवडते दैवत. जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान आणि जीवनाचा अर्थ कळतो तो श्रीकृष्णचरित्रातून. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राची मोहिनी कायम भाविकांना पडते.

स्वरतरंग म्युझिक अकॅडमी : भक्तिरसात रसिक झाले चिंबनागपूर : भगवान श्रीकृष्ण म्हणजे भारतीयांचे आवडते दैवत. जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान आणि जीवनाचा अर्थ कळतो तो श्रीकृष्णचरित्रातून. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राची मोहिनी कायम भाविकांना पडते. त्यामुळे भगवान कृष्णाची जन्माष्टमीही भाविक मोठ्या भक्तिभावाने साजरी करतात. जन्माष्टमी लवकरच येणार आहे. यानिमित्ताने भगवान कृष्णाच्या चरित्राचे गायन करणाऱ्या ‘श्रीकृष्ण गीतांजली’ हा कार्यक्रम आज सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला. स्वरतरंग संगीत अकादमीच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना संस्थेचे संचालक निरंजन बोबडे यांची होती. ही श्रीकृष्ण गीतांजली चंद्रशेखर वराडपांडे उपाख्य कमलासूत यांनी रचली आहे. विशेषत: या गीतांजलीचा हा पाचवा नागपुरातील कार्यक्रम असूनही रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. भगवान श्रीकृष्णाच्या गीतांचे सुरेल सादरीकरण आणि ज्या प्रसंगावर गीत आधारित आहे तो प्रसंग एलसीडी स्क्रीनद्वारे प्रदर्शित करण्यात येत असल्याने रसिकांना या कार्यक्रमाचा अधिक आनंद घेता आला. आपण साक्षात द्वारकेत कृष्णाच्या राज्यात असल्याचाच भास यावेळी निर्माण करण्यात सारेच कलावंत यशस्वी ठरले. त्यात राजेश अमीन यांनी रंगमंचाची सुबक सजावट केल्याने वातावरणनिर्मिती साधली गेली. किशोर गलांडे आणि स्नेहल खंडकर यांचे विवेचनात्मक भाष्य गीतांचा परिणाम वाढविणारे होते. निरंजनने ‘कथा ही निर्मल भक्तीची...’ या गीताने प्रारंभ केला आणि त्यानंतर सारेच श्रोते कृष्णभक्तीत तल्लीन झाले. गायत्री गायकवाड आणि मंजिरी वैद्य यांनी ‘कृष्ण जन्मला ग सखे...’ हे गीत सादर करून कृष्णजन्माच्या आनंदात रसिकांना भिजविले. त्यानंतर श्रेया खराबे हिने ‘मोहक हे रूप तुझे...’ तर रघुनाथ बोबडे यांनी ‘जाहला कंसाचा संहार...’ आणि श्रीनिधी घटाटेने ‘रुक्मिणी महाराणी जाहली...’ हे गीत तयारीने सादर केले. याप्रसंगी ‘करू या गोवर्धन पूजन..., रसरंगी श्रीरंग रंगला..., अक्रूरा नेशी कुठे घनश्याम..., कलंक स्यमंतका..., सुदामा येई द्वारकापुरी..., दुष्ट तो कालयवन संपला..., वाचावी अब्रू यदुनाथा..., कृष्णा सांगितली गीता...’ आदी गीते सादर करण्यात आली. ‘ओम नमो भगवते वासुदेवा...’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमात भानुदास कुळकर्णी, पंकज यादव, श्रीकांत सूर्यवंशी, अक्षय आचार्य, सुभाष वानखेडे, सुमंत बोबडे, अरविंद उपाध्ये यांनी विविध वाद्यांवर साथसंगत केली. ध्वनी स्वप्नील उके यांचा तर व्हिडिओ संयोजन जावेद शेख यांचे होते. (प्रतिनिधी)