शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

दु:ख, अपमान, मनस्ताप अन् आक्रोश..

By admin | Updated: May 13, 2014 00:59 IST

मृत्यूच्या जबड्यात वावरणार्‍या जवानांच्या नातेवाईकांना कशी वर्तणूक मिळावी? आपुलकीची! होय, या बिचार्‍या हवालदिल जीवांना आता आपुलकीचीच नितांत आवश्यकता आहे

संतप्त नातेवाईकांचा सवाल : प्रशासनाविषयी नाराजी

नरेश डोंगरे - नागपूर

मृत्यूच्या जबड्यात वावरणार्‍या जवानांच्या नातेवाईकांना कशी वर्तणूक मिळावी? आपुलकीची! होय, या बिचार्‍या हवालदिल जीवांना आता आपुलकीचीच नितांत आवश्यकता आहे. मात्र, त्यांना आज सकाळपासून नागपुरात अपमानास्पद अन् तिटकार्‍याची वर्तणूक मिळाली. आज रात्री त्यांचा रोष उफाळून आला. त्यांनी थेट सवाल केला, कशासाठी करता हा तमाशा?

गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात गंभीर जखमी झालेल्या हेमंत बन्सोडे (३0) आणि पंकज सिडाम (२९) या जवानांना येथील ऑरेंजसिटी ईस्पितळात दाखल करण्यात आले आहे. स्फोटात संपूर्ण शरीरावर गंभीर दुखापत झाल्यामुळे बन्सोडे कोमात गेले. डॉक्टरांनी बन्सोडे यांच्यावर ‘ट्रफीऑक्टॉमी’ची शस्त्रक्रिया (श्‍वसन नलिकेत छिद्र) केली. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ‘लोटस् हॉटेल’मध्ये केली. रविवारच्या रात्रीचे कसेबसे भागले. आज दुपारचे जेवण घ्यायला गेलेल्या नातेवाईकांना पैशाची मागणी करण्यात आली. एवढय़ा दुरून घाईगडबडीत आलेल्या या बिचार्‍यांजवळ पैसे कुठून असणार?

सिडाम यांच्या डोक्याला, हाताला, कानाला आणि शरीराच्या अन्य भागांना स्फोटामुळे गंभीर जखमा आहेत. प्रकृती धोक्याबाहेर असली तरी त्यांना अतिदक्षतेत प्रदीर्घ उपचार घ्यावे लागणार असल्याचे डॉक्टर सांगतात. या दोघांच्या प्रकृतीमुळे त्यांच्या नातेवाईकांचाही जीव टांगणीला लागला आहे. जखमींना तर पोलिसांनी हेलिकॉप्टरने नागपुरात आणले. मात्र, त्यांचे नातेवाईक मिळेल ते वाहन पकडून दिवसभराचा प्रवास करून नागपुरात आले. इस्पितळाची शोधाशोध करीत ऑरेंजसिटीत पोहोचले. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था गडचिरोली पोलिसांतर्फे करण्याचे ठरले होते. मात्र, स्फोटातील मृतदेह पाहून स्थानिक संपर्क अधिकारी (गडचिरोली लायझनिंग ऑफिसर) बेशुद्ध पडले. घाईगडबडीमुळे दुसरा संपर्क अधिकारी येथे येऊ शकला नाही. परिणामी मोठा घोळ झाला. स्थानिक (नागपूर) पोलिसांनी बन्सोडे आणि सिडामच्या नातेवाईकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था ऑरेंजसिटी समोरच्या

आपला माणूस असा मृत्यूच्या जबड्यात फसला असताना कशाला जेवणासाठी कुरबूर करायची, असा प्रश्न स्वत:च स्वत:ला करून या बिचार्‍यांनी रखरखत्या उन्हात तोंडाचे पाणी गिळत दिवस काढला. रात्री ७.४५ ला गृहमंत्री आर. आर. पाटील इस्पितळात आले. पोलीस अधिकारी, पत्रकार आणि काही नेते, कार्यकर्त्यांचाही गर्दी झाली. तब्बल ४0 ते ५0 मिनिटे त्यांची धावपळ चालली. इस्पितळाच्या व्हरांड्यातच असलेल्या या नातेवाईकांची विचारपूस करण्याचे कुणी सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे त्यांचा रोष उफाळून आला.

कशासाठी हा तमाशा करता, असा सवाल करीत त्यांनी आपला रोष व्यक्त केला. सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करू, असे परवलीचे वाक्य त्यांनी काही वेळेपूर्वीच ऐकले होते. त्यामुळे मृत्यूच्या दारात लोटण्यापूर्वीच का नाही सुरक्षेच्या उपाययोजना करत, असा सवाल त्यांनी केला. सर्व व्यवस्था आहे, सर्व व्यवस्था आहे, असे सांगतात. आमच्या नातेवाईकांनी यांच्यासाठी जीव टाकायचा, त्यांनी मात्र आमची साधे अंग टाकायचीही व्यवस्था नाही करायची, असे म्हणत सर्वच एकसाथ बोलते झाले. प्रस्तुत प्रतिनिधीने चौकशी केली असता, त्यांनी एकदमच आपली कैफियत मांडली. बन्सोडे मृत्यूच्या विक्राळ जबड्यात फसल्यामुळे त्याची अडीच महिन्याची गरोदर पत्नी वेड्यागत झाली आहे. वारंवार बेशुद्ध पडत आहे. त्याचा भाऊ अपंग आहे. वृद्ध आई-वडिलही कमालीचे चिंतातूर आहेत. ही मंडळी नागपुरात आली. त्यांच्यासोबत त्यांना धीर द्यायला गडचिरोली जिल्ह्यातील त्यांचे रक्ताचे नातेवाईक आले. आज सकाळपासून त्यांना साधे जेवणही मिळाले नाही. पैसे आणा, तेव्हा जेवण मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले आहे. सिडामच्या नातेवाईकांचेही असेच आहे.