शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

किशोरदा घरीही नेहमीच गीत गुणगुणत असायचे

By admin | Updated: August 4, 2014 01:21 IST

किशोरकाकांची आज मला खूप आठवण येते. आम्ही लहान होतो पण किशोरकाकांकडे माझा प्रत्येक उन्हाळा जायचा. त्यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. त्यांच्यासोबत राहणे म्हणजे मस्ती आणि मस्ती.

किशोरकुमार यांची पुतणी चंद्रा संन्याल यांच्या आठवणी : आज किशोरकुमार यांचा जन्मदिननागपूर : किशोरकाकांची आज मला खूप आठवण येते. आम्ही लहान होतो पण किशोरकाकांकडे माझा प्रत्येक उन्हाळा जायचा. त्यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. त्यांच्यासोबत राहणे म्हणजे मस्ती आणि मस्ती. त्यामुळे आम्हा लहान मुलांना किशोरकाका खूप आवडायचे. घरी असले की खूप विनोद आणि अंगविक्षेप करून ते आम्हा सर्व घरातल्या लहान मुलांना हसवत ठेवायचे. त्यामुळेच ते आम्हाला आवडायचे. पण ते शिस्तीचे पक्के होते. घरी वरच्या खोलीत त्यांचा स्टुडिओ होता. तेथे गीतांवर चर्चा सुरू असताना आम्ही मस्ती केली तर ते खूप चिडून जायचे. घरात असतानाही ते काहीतरी नवीन सापडल्यासारखे गुणगुणतच राहायचे. त्यांच्या प्रत्येक खोलीत एक टीव्ही आणि रेकॉर्डिंगचे सामान असायचे. कुठल्याही खोलीत नवीन चाल सुचली की ते रेकॉर्ड करून ठेवायचे आणि एस. डी. व आर. डी. बर्मन यांना ऐकवायचे. मला आठवते अनेक बाबतीत तर एस. डी. बर्मनही किशोरकाकांवरच विसंबून राहायचे. मधुबाला काकीच्या सौंदर्याबद्दल तर आम्हालाही खूप आकर्षण होते. एकदा आम्ही लहान मुलांनी मधुबाला काकीच्या खोलीत प्रवेश केला आणि त्यांची कॉस्मेटिक शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला वाटले, खूप कॉस्मेटिक लावल्याशिवाय इतके सुंदर कुणी दिसूच शकत नाही. पण त्या कुठलेही कॉस्मेटिक वापरतच नव्हत्या. त्यांच्या खोलीत आम्हाला हलक्या गुलाबी रंगाचे फक्त लिपस्टीक सापडले. मधुबाला काकीशी माझे खूप जमायचे. काकी गेल्यावर किशोरकाकांना खूप दु:ख झाले होते.