शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

समाज आणि डॉक्टर एकमेकांना पूरक

By admin | Updated: July 3, 2014 00:56 IST

डॉक्टरांशिवाय समाज नाही आणि समाजाशिवाय डॉक्टर नाही. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी डॉक्टर डॉक्टरच राहतील. रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संवेदनशिलता होणे आवश्यक आहे. आरोग्यसेवेत माणुसकीशी

आयएमए : ‘डॉक्टर्स डे’निमित्त वरिष्ठ डॉक्टरांचा सत्कार नागपूर : डॉक्टरांशिवाय समाज नाही आणि समाजाशिवाय डॉक्टर नाही. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी डॉक्टर डॉक्टरच राहतील. रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संवेदनशिलता होणे आवश्यक आहे. आरोग्यसेवेत माणुसकीशी बांधिलकी मानून रु ग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा आदर समाज करतो, असे प्रतिपादन कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी येथे केले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने (आयएमए) मंगळवारी आयोजित ‘डॉक्टर्स डे’निमित्त डॉक्टरांच्या गुणवंत मुलांचा आणि वरिष्ठ डॉक्टरांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर आयएमए नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे, सचिव डॉ. कुश झुनझुनवाला आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरचे उपकुलपती डॉ. विनायक देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वरिष्ठ चिकित्सक डॉ. प्रभा बाला, डॉ. कांचा सेठ, डॉ. एस. डब्ल्यू. कुलकर्णी, डॉ. बी. एम. सहाय, डॉ. जी. के. सरोदे आणि मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांचा शाल-श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. मिश्रा म्हणाले, आजही रुग्ण ईश्वराएवढाच रुग्णांवर विश्वास ठेवतात. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी डॉक्टरांनी आपली जबाबदारी ओळखून कर्तव्य पार पाडावे. सत्काराला उत्तर देताना डॉ. वाकोडे म्हणाले, डॉक्टर होण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते, नंतर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हा सत्कार व्यक्तीचा नसून त्यांच्या कार्याचा आहे, असेही ते म्हणाले. डॉ. देशपांडे म्हणाले, रुग्णासाठी डॉक्टर ईश्वरच असतो. परंतु डॉक्टर हा सुद्धा माणूस आहे आणि मानवी प्रयत्नांना मर्यादा आहे. यामुळे प्रत्येक वेळी सांगितल्यानुसारच होऊन आजारमुक्ती, मरणमुक्ती मिळेल असं नसतं. प्रत्येक डॉक्टर रुग्णाला वाचविण्यासाठी मनापासून प्रयत्न करीत असतो. यावेळी डॉ. देशपांडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडून भविष्यातील कार्यक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)