शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट नाकाबंदीतून स्मार्ट वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:48 IST

अनपेड चालान - वाहतूक शाखेकडून २० दिवसांत सव्वा कोटी वसूल नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वाहतुकीच्या नियमांचे ...

अनपेड चालान - वाहतूक शाखेकडून २० दिवसांत सव्वा कोटी वसूल

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून पोलिसांना वाकुल्या दाखविणाऱ्या वाहनचालकांकडून थकीत चालान वसुली करण्यासाठी ‘स्मार्ट वसुली अभियान’ वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सुरू केले आहे. विशेष म्हणजे, कुठंही कोणताही वाद न होता, अवघ्या २० दिवसांत या अभियानातून चक्क एक कोटी २० लाखांची वसुली झाली आहे.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस दंडापोटी (तडजोड) शुल्क आकारतात. या शुल्क आकारणीच्या रोख स्वरूपाच्या प्रक्रियेत ‘ऑन द स्पॉट मांडवली’ होत असल्याची जुनीच ओरड आहे. त्याचे अनेक किस्सेही उघड झाले आहेत. ते लक्षात घेता दोन वर्षांपूर्वी ई चालान पद्धत अमलात आली. त्यानुसार, नियम तोडून पळणाऱ्या वाहनचालकांना दंडाची पावती (ई चालान) त्यांच्या पत्त्यावर (घरी) पाठविण्यात येऊ लागली; मात्र त्यालाही हजारो वाहनचालकांनी वाकुल्या दाखविल्या. त्यामुळे अनपेड चालानची संख्या प्रचंड वाढली. नागपूर वाहतूक शाखेच्या पोलिसांचे चक्क १६ कोटी रुपये वाहनचालकांकडे थकीत झाले. हे कसे वसूल करावे, हा प्रश्न पोलिसांची डोकेदुखी वाढवत होता. पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी त्यावर स्मार्ट तोडगा काढला. त्यानुसार, वाहतूक पोलिसांकडून १३ जानेवारीपासून शहरातील विविध भागांत ‘स्मार्ट नाकाबंदी’ करण्यात येऊ लागली. प्रत्येक वाहतूक पोलिसांच्या मोबाईलमध्ये स्मार्ट अनपेड चालानचे ॲप डाऊनलोड करण्यात आले. बारकोड असलेली नंबरप्लेट मोबाईलमध्ये फोटो काढून स्कॅन केल्यास त्यावर चालानची किती रक्कम थकीत (अनपेड) आहे, ते या ॲपमधून पोलिसांना तत्काळ कळते. त्यामुळे तिथल्या तिथे वाहनचालकाकडून वसुली करून त्याच्या हातात पावतीही ठेवणे सोपे जाते. २० दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या स्मार्ट नाकाबंदीतून पोलिसांचे १६ कोटींपैकी आतापावेतो एक कोटी २० लाख रुपये वसूल झाले आहेत. अत्यंत क्लिष्ट ठरलेल्या अनपेड चालानच्या वसुलीवर असा परिणामकारक तोडगा निघाल्याने वाहतूक शाखेच्या वसुलीची गाडी सुसाट धावत आहे.

----

पाच ते सात लाखांची रोज रिकव्हरी - उपायुक्त आवाड

स्मार्ट नाकाबंदी आणि स्मार्ट वसुलीच्या उपक्रमातून रोज पाच ते सात लाखांची वसुली होते आहे. त्यामुळे आमच्या अनपेड चालानच्या १६ कोटींची वसुली अतिशय सहजपणे आम्ही लवकरच करू. या उपक्रमातून कुणा वाहनचालकाशी वाद होत नाही किंवा कुणाकडून आरोप होण्याचाही प्रश्न नसल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

----